तुळजापूर - महाराष्ट्र राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या हस्ते व सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक युवकांनी बुधवारी (दि.9) शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला.
यावेळी बापूसाहेब भोसले, अभिजित अमृतराव, धर्मराज पवार, माजी नगरसेवक तथा बार असोसिएनचे अध्यक्ष अॅड.संजय पवार, अॅड.उदयसिंह भोसले, देवसिंगाचे सरपंच देविदास राठोड, मोहन भोसले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष बिपिन खोपडे, रमेश ननवरे, खंडू कुंभार, देवानंद चव्हाण, निरंजन करंडे, गणेश रोकडे, अभिजीत पाटील, सुरज कोठावळे, निलेश कदम, संजय गायकवाड, अनिल जाधव, कृष्णा घाटे, शाहूराज कोरेकर, राजकुमार कोरेकर, मल्हारी कांबळे, स्वराज कदम, अमोल शिंदे, धनाजी खंडाळकर, पवन कदम, प्रमोद कदम, सचिन विलास धुरगुडे, ज्येष्ठ शिवसैनिक मनोज मिश्रा यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा आज जाहीर प्रवेश घेण्यात आला.
पालकमंत्री महोदयांनी पक्षप्रवेशानंतर मंदिरच्या प्रशासकीय कार्यालयात जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्यासमवेत बैठक घेऊन होणार्या मंदिर विकास आराखड्यातील त्रुटी निदर्शनास आणून दिल्या. भक्तांनी देवीस अर्पण केलेले दागिने गहाळ प्रकरणी चौकशी पूर्ण होताच कोणाला ही पाठीशी घातले जाणार नाही असे त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. तसेच भवानी रोडवर चांभारगल्ली समोरील लोखंडी गेट दुचाकी वाहनास खुले करण्याचे आदेश दिले.
यावेळी उस्मानाबाद जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम परमेश्वर, शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, सुरज साळुंके, दत्ता साळुंके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, अनिल खोचरे, प्रा.गौतम लटके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, शिवसेना तालुकाप्रमुख संभाजी पलंगेसह आदीसह इतर पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.