शालेय पोषण आहार मधील कार्यकर्त्याच्या प्रलंबित मागण्यासाठी धरणे आंदोलन

0
शालेय पोषण आहार मधील कार्यकर्त्याच्या प्रलंबित मागण्यासाठी धरणे आंदोलन

उस्मानाबाद : शालेय पोषण आहार मधील कार्यकर्त्याच्या प्रलंबित मागण्या पुर्ण करण्याची मागणी शालेय पोषण आहार संघटनेच्या वतीने दि 9 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

उस्मानाबाद जिल्हा शालेय पोषण आहार संघटनेच्या वतीने शालेय पोषण आहार कामगारांना दहा महिन्याच्या ऐवजी १२ महिने मानधन देण्यात यावे, हरियाना, तामिळनाडू येथे शालेय पोषण कामगारांना प्रति महिना १८०००/- मानधन आहे. त्या प्रमाणे मानधन देण्यात यावे, शालेय पोषण आहार कामगारांना शिपाई दर्जा देण्यात यावा, शालेय पोषण आहार कामगारांना पोषण आहार बनविण्याच्यतिरीक्त इतरीत काही कामे सांगु नये, शालेय पोषण आहार कामगारांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करुन घ्यावे, शालेय पोषण आहार कामगारांना विनाकारण कामावरुन कमी करण्यात येवु नये. जर त्याच्याकडून चुक झाली असेल तर त्याची चौकशी करुन नंतरच त्याला कामावरुन कमी करावे. मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. व जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

प्रशासनाने संघटनेच्या मागण्यांचा तात्काळ विचार करावा अन्यथा संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष कुसम देशमुख, अण्णासाहेब डांगे , शेख अली, सुरेश धायगुडे, शितल तोरे, जयश्री वरपे, यांच्यासह जिल्ह्यातून आलेले शालेय पोषण कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top