परदेशातील धान्याची लागवड उस्मानाबादेत व विक्री परदेशात

0



Osmanabad - चिया नावाचे पिक असतय हे कुणाला सांगितल तर विश्वास बसणार नाही बरं चिया हे नाव तुम्ही पहिल्यांदाच ऐकल असेल पण हे खरं आहे चिया हे पिक आहे अमेरिकेतील मेक्सिको प्रांतात याचे उत्पन्न घेतले जाते. आणि त्याच चियाची लागवड  उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शिराढोण येथील शेतकऱ्याने केलीय

नामदेव माकोडे या शेतकऱ्याने पारंपरिक पिकांना बगल देत हा प्रयोग केलाय तीन एकरसाठी अँमेझाँनवरुन आँनलाईन पध्दतीने ६ किलो चियाच्या बिया मागवल्या पेरणी यंत्राने पेरले कुठली फवारणी नाही औषध नाही ११० ते १४० दिवसात हे पिक येतय खर्च एकरी २० हजार रुपयांच्या आसपास येतोय तर उत्पन्न एकरी  दोन लाख रुपये मिळते शिवाय विक्री सुध्दा आँनलाईन होते शिवाय मध्यप्रदेशातील निमचमंडी येथे विक्री सुध्दा होते

चिया हे पिक असुन चिया मध्ये ओमेगा -३ ( मिनरल) ओमेगा-६ फायबर, पोटँशाअम , प्रोटीनचे प्रमाण जास्त असते , तांबे , फँट, सोडिअम, फाँसफरस , मँगनिज , याचे पोषक तत्वे जास्त आढळतात म्हणुन अंतराळात जाणाऱ्या व्यक्तीला हे चियाचे अन्न दिले जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top