तेलंगणातील सरकारने शेतकऱ्यांचे १९००० कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याच्या घोषणेनंतर तुळजापूर येथे बी आर एस party च्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडुन केला जल्लोष

0


तेलंगणातील सरकारने शेतकऱ्यांचे १९००० कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याच्या घोषणेनंतर तुळजापूर येथे बी आर एस  party च्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडुन केला जल्लोष

तेलंगणातील सरकारने 2 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांचे 19000 कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याची घोषणा करताच KCR साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश सुकाणू समिती, भारत राष्ट्र समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार, सुनील चव्हाण यांच्या सहकार्याने तुळजापूर येथे भारत राष्ट्र समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडुन शेतकरी हिताच्या या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करत साखर वाटप करण्यात आली. 

तेलंगणाचे लोकप्रिय मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय के. चंद्रशेखर राव यांचे योग्य नियोजन, प्रचंड राजकीय इच्छाशक्ती व अहोरात्र मेहनत या त्रिसूत्राने तेलंगणा राज्याचे नंदनवन बनले आहे. तेथील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनता यांच्या जिवनात आमूलाग्र अशी क्रांती झाली आहे. 

 तेलंगणा राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या योजना, तेलंगणाचे विकासाचे मॉडेल हे महाराष्ट्रात  देखील राबविले जावे यासाठी भारत राष्ट्र समितीचे कार्यकर्ते महाराष्ट्रभर पक्ष संघटना मजबूत झाली आहे. असे मत सुनील चव्हाण यांनी व्यत केले.

त्यावेळी सुनील गंगणे, संदीप राठोड, ऋषी चव्हाण, व्यंकट राठोड, आरिवद घोडके, सुरज बचाटे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top