देशामध्ये तिरस्कार व वक्तव्य करुन जातीय द्वेष पसरविणाऱ्या विरुद्ध कठोर कायदा करण्यात यावा

0



देशामध्ये तिरस्कार व वक्तव्य करुन जातीय द्वेष पसरविणाऱ्या विरुद्ध कठोर कायदा करण्यात यावा 



उस्मानाबाद दि.४ ( osmanabadnews ) - देशामध्ये तिरस्काराचे भाषण व वक्तव्य करून जातीय द्वेष पसरविणाऱ्या व्यक्तीमुळे जातीय दंगली होत आहेत. त्यामुळे देशातील नागरिक एकोप्याने राहावेत. यासाठी अशा व्यक्ती व संघटना विरुद्ध कठोर कायदा करण्यात यावा, अशी मागणी सर्व समाजातील व्यक्तींनी जिल्हाधिकाऱ्यामार्फत प्रधानमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे दि.४ ऑगस्ट रोजी केली आहे.



दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, देशामध्ये सध्या राजकीय हेतू साध्य करण्यासाठी मतांचे धृवीकरण चालू आहे. त्यासाठी देशात राहणाऱ्या अल्पसंख्यांक समाजाला विशेष लक्ष केले जात आहे. तसेच त्यांचा धर्म, त्यांचे राहणीमान व त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धती, धार्मिक स्थळे, जुनी राज्य व्यवस्था व राजे यांच्याबद्दल जातीयवादी संघटना व पक्षातील व्यक्ती विनाकारण इतर समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी विषारी विधाने करीत आहेत. खास करून मुस्लिम समाजाबद्दल इतर समाजामध्ये द्वेषाचे विष पेरत आहेत. त्यामुळेच जयपुर - मुंबई एक्सप्रेसमध्ये आरपीएफचे कॉन्स्टेबल चेतन याने तीन मुस्लिम निष्पाप व्यक्तींना गोळ्या घालून ठार मारले. तसेच संपूर्ण देशांमध्ये देशाच्या भाषणाने हिंसा होत आहे. राजकीय फायद्यासाठी धर्माच्या नावावर हिंदूंना मुस्लिमांच्या विरुद्ध लढविले जात आहे. तर देश भरलेली भाषणे व वक्तव्य समाजात विष पसरविण्याचे काम करीत असल्यामुळे अनेक राज्यांमध्ये अपराधिक कृती जन्माला येत आहे. तसेच त्यांना वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. तसेच देशांमध्ये मोठी अराजकता माजेल याचे गांभीर्य लक्षात घेऊन एखाद्या समाज व धर्माबद्दल द्वेषाचे भाषण करणे, विषारी वक्तव्य करणे याविरुद्ध अत्यंत कडक कायदे करून अशा आरोपींना कठोरात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. यावेळी मसूद शेख, प्रशांत पाटील, अमित शिंदे, महादेव माळी, उमेश राजेनिंबाळकर, अग्निवेश शिंदे, खलील सय्यद, शेखर घोडके, अभिजीत काकडे, धनंजय शिंगाळे, सचिन दिलपाक, महादेव माळी, पृथ्वीराज चिलवंत, आयाज शेख, नितीन लांडगे, बिलाल तांबोळी, लक्ष्मण सोनवणे, विशाल शिंगाडे, खादर खान, समीयोद्दीन मशायक, अतीक‌ शेख, एजाज काझी, वाजिद पठाण, दाजी पवार, अनवर शेख, बाबा मुजावर, नागेश कदम, सरफराज मोमीन, जाकीर खाँ पठाण, इस्माईल काझी, मेहुद मुजावर, मन्नान काझी, ॲड जावेद काझी, इस्माईल शेख आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top