मणिपूर, ईशान्य भारत समजून घेताना’ शाहू पाटोळे यांचे शनिवारी उस्मानाबाद शहरात व्याख्यान

0

मणिपूर, ईशान्य भारत समजून घेताना’ शाहू पाटोळे यांचे शनिवारी उस्मानाबाद शहरात व्याख्यान


 उस्मानाबाद, दि. 4 -
मणिपूरमधील ताज्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ‘मणिपूरच्या अनुषंगाने ईशान्य भारताचे मानस समजून घेताना’ या विषयावून माहिती व प्रसारण मंत्रालयाचे सेवानिवृत्त उपसंचालक शाहू पाटोळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सायंकाळी 4 वाजता शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात हे व्याख्यान होणार आहे.

उस्मानाबाद येथील युवा साहित्य समूहाच्या माध्यमातून मणिपूर आणि ईशान्य भारत समजून घेताना या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात प्रत्यक्ष या परिसरातील अनुभूती असलेले शाहू पाटोळे विवेचन करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य डॉ. रमेश दापके असणार आहेत. शहर आणि परिसरातील नागरिकांनी बहुसंख्येने या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन युवा साहित्य समूहाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top