मटका जुगार विरोधात जिल्हात ६ ठिकाणी कारवाई, उस्मानाबाद धाराशिव शहरात अनेक ठिकाणी खुलेआम मटका जुगार! कारवाई कधी?

0



मटका जुगार विरोधात जिल्हात ६  ठिकाणी कारवाई, उस्मानाबाद धाराशिव शहरात अनेक ठिकाणी खुलेआम मटका जुगार! कारवाई कधी?


उस्मानाबाद -धाराशिव जिल्ह्यात पोलीसांनी मटका जुगार विरोधात ६ ठिकाणी कारवाई केली आहे याचे थेट संबंध कळंब व उस्मानाबाद -धाराशिव शहराशी जोडला असल्याचे बोलले जात आहे. उस्मानाबाद -धाराशिव शहरातील वैराग नाका, दुध डेअरी अडत लाईन परीसर , तुळजापूर नाका, धाराशिव मर्दिनी कमान, सांजा चौक , इंदिरा नगर, छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर , बार्शी नाका परिसर , नागनाथ रोड परिसर, ज्ञानेश्वर मंदिर कमान परिसर, तेरणे कॉलेज चौक , नगरपरिषद कंपाऊंड परिसरात, अगड गल्ली , भारत टाकीज परिसर , भाजी मंडई परिसरात , एम एस सी बी ऑफिस समोरील अतिक्रमणामध्ये खुलेआम मटका जुगार सुरू आहे. जिल्ह्यात होणाऱ्या मटका जुगाराच्या व्यवसायात कळंब शहर व उस्मानाबाद - धाराशिव शहराचे थेट संबंध असल्याचे बोलले जात आहे मात्र कारवाई झाल्यानंतर मुख्य सूत्रधार समोर येत नाहीत. मुख्य सूत्रधार मटका चालक बुकी मालक यांना नेमक पाठीशी कोण घालत आहे असा सवाल जिल्हाभरातील नागरिक उपस्थित करत आहेत. मटका नावाचा जुगारामुळे अनेक गोरगरिबांचे संसार उध्वस्त होत आहेत.  उस्मानाबाद-धाराशिव शहरात कारवाई कधी होणार असाही प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.


वाशी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान वाशी पोलीसांनी दि.30.09.2023 रोजी 11.40 ते 16.00 वा. सु. वाशी पो. ठा. हद्दीत 3 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)लतीफ अन्वर पठाण, वय 52 वर्षे, रा. अंजनसोंडा ता. भुम जि. धाराशिव हे अंजनसोंडाहाचे हॉटेलमध्ये ता. भुम येथे कल्याण मटका जुगाराच्या साहित्यासह एकुण 680 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 2)श्रीराम तुकाराम भराटे, वय 27 वर्षे, रा. पारा, ता. वाशी जि. धाराशिव हे मुख्‌य चौक येथील विशाल भारत भराटे यांचे चहाचे हॉटेल शेजारी सुरट मटका जुगाराच्या साहित्यासह एकुण 540 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 3)संतोष बाबुराव अंबड, वय 48 वर्षे, रा. वाशी, ता. वाशी जि. धाराशिव हे वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे स्वताचे टपरीमध्ये कल्याण मटका जुगाराच्या साहित्यासह एकुण 620 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये वाशी पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.

बेंबळी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान बेंबळी पोलीसांनी दि.30.09.2023 रोजी 18.40 ते 19.20 वा. सु. बेंबळी पो. ठा. हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)सुनिल शंकरराव ढाकरे, वय 49 वर्षे, रा. पाडोळी, ता. जि. धाराशिव हे पाडोळी येथील आकुबाई मंदीराजवळ मिलन नाईट मटका जुगाराच्या साहित्यासह एकुण 550 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 2)बाळासाहेब आत्माराम जाधव, वय 40 वर्षे, रा. महाळंगी ता. जि. धाराशिव हे महाळंगी येथील ग्रामपंचायत कार्यालय जवळ मिलन नाईट मटका जुगाराच्या साहित्यासह एकुण 670 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

भुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीसांनी दि.30.09.2023 रोजी 13.15 वा. सु.  भुम पो. ठा. हद्दीत फ्लोरा चौक भुम येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)आयाज अब्दुल पठाण, वय 20 वर्षे, रा. गराडा गल्ली, ता. भुम जि. धाराशिव हे फ्लोरा चौक भुम येथे कल्याण मटका जुगाराच्या साहित्यासह एकुण 630 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे. अशी माहिती पोलिसांच्या वतीने देण्यात आली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top