उस्मानाबाद धाराशिव शहरात स्वच्छता वाऱ्यावर भाग-२ , गुत्तेदाराकडून नियम अटींचे उल्लंघन , स्वच्छता झालीच नाही मात्र दंड लावून देयके अदा?

0


उस्मानाबाद धाराशिव शहरात स्वच्छता वाऱ्यावर भाग-२ , 




गुत्तेदाराकडून नियम अटींचे उल्लंघन , स्वच्छता झालीच नाही मात्र दंड लावून देयके अदा?



जिल्हाधिकारी यांना शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून दिलेली निवेदन स्टंट?



तुम्ही करा मारल्या सारखं मी करतो रडल्या सारख अशी अवस्था निर्माण झाली?



उस्मानाबाद धाराशिव नगरपालिका प्रशासनाकडून शहरातील स्वच्छता करण्यासाठी अनेक नियम अटी घालून टेंडर प्रक्रिया करून देण्यात आली होती. काम न करणाऱ्या ठेकेदारालाच पुन्हा पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. गुत्तेदार कोणत्याही नियमाचे पालन केलेलं नाही याबाबत नगरपरिषद मध्ये नागरिकांनी अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. गुत्तेदाराला कोणतेही काम न करता नगरपालिका प्रशासनाकडून थोडं दंड करुन देयके / बील दिले आहे. नगरपालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात आली नाही ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याच्या सुचेना खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी दिल्या होत्या. तसेच शहरातील नागरिकांनी देखील निवेदने दिली आहेत.




मागील 2022 वर्षात शहरात स्वच्छता करण्यात आली नाही. शहरातील नागरिकांनी या बाबतीत अनेक वेळा कारवाई करण्यासाठी तक्रारी केल्या आहेत. मात्र नगरपालिका प्रशासनाकडून स्वच्छता अधिकारी यांनी कारवाई न करता बिले मंजूर करून देयके दिली आहेत.




काम न करता बिले मंजूर करणाऱ्या अधिकारी व गुत्तेदारावर तात्काळ कारवाई करण्यात यावी व देयके दिलेली वसुल करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. आमदार कैलास घाडगे-पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नगरपरिषद येथे बैठक घेऊन काम न करणाऱ्या ठेकेदाराची देयक देऊ नये असे सांगितले होते मात्र आमदार, खासदार यांच्या आदेश न जुमानता देयके काढण्यात आली आहेत.





गुत्तेदाराला अटी व शती घालून देण्यात आल्या होत्या ते खालील प्रमाणे...

1. नगर परिषदेने सुचविल्या नुसार घर ते घर कचरा संकलन करणे तसेच नागरीकां मध्ये जनजागृती करुन विलगीकृत कचरा संकलन करणे व कचरा डेपो पर्यंत वाहतुक करुन जमा करणे व ओल्या कच-यावर प्रक्रीया करुन कंपोस्ट खत तयार करणे

2. कचरा डेपोवर संकलित झालेला कच-याचे वर्गीकरण करुन ओल्या कच-या पासुन कंपोस्ट खत तयार करणे

तसेच सुक्या कच-याचे शास्त्रोत पध्दतीने विल्हेवाट लावणे या बाबत MRF सेंटर कार्यान्वित करणे बंधनकारक राहील.

3. घर ते घर कचरा संकलन कामी वाहनाचा रोड मॅप तयार करणे व त्याच पध्दतीने काम सुरु झाल्याचे पत्र सादर करणे बंधनकारक राहील.

4. घन कचरा व्यवस्थापन व हताळणी अधिनियम 2016 चे तंतोतंत पालन करणे बंधनकारक राहील.

5. सर्व पुरवठा करण्यात आलेल्या मजुर कर्मचारी यांना गणवेश व ओळखपत्र देणे व तसेच सर्व सुरक्षा साधणे (PPE Kit, रेणकोट, गमबुट, हॅन्डालोज, मास्क इ.) पुरवावे लागतील. ही संपूर्ण जबाबदारी मक्तेदाराची राहील. त्याबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास नगर परिषद जबाबदार राहणार नाही.

6. घनकचरा व्यवस्थापन करताना साफसफाईी किंवा घर ते घर कचरा संकलन करणे कामी कचरा वेचक यांना मक्तेदारांनी आपल्या कामात समाविष्ट करुन घेण्यास प्राधान्य देण्यात यावे.

7. मक्त्यातील कर्मचारी यांना शासनाचे सर्व नियम / दिशा निर्देश (इ.पी.एफ., पी.टी.डी.ए.इन्सुशरन्स) मक्तेदारास बंधनकारक राहतील. या कामी न. प. जबाबदार असणार नाही.

8. घनकचरा कामासाठी लावलेल्या मजुरांची कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी व त्यासंबंधीच्या इतर अधिनियम 1952 मधील तरतुदी नुसार खाते उघडणे बंधनकारक राहील. अन्यथा देयक अदा करण्यात येणार नाही.

9. नगर परिषदेच्या आवश्यकते नुसार वेळोवेळी कामात केलेली बदल आपणास सुचविण्यात येतील व त्यानुसार अंमल बजावणी करणे आपणावर बंधन कारक राहील. आपले काम असमाधानकारक आढळुन आल्यास नगर परिषदेस दंड करण्याचा अधिकार राहील

10. कामकाजाच्या दरम्यान कुठलाही वाद अथवा कायदेशिर बाब उद्भवल्यास मा. मुख्याधिकारी न.प.उस्मानाबाद निर्णय देतील तो मक्तेदारास बंधनकारक राहील.

11. घर ते घर कचरा संकलन करताना 100% ओला कचरा व 100% सुका कचरा वर्गीकृत करून संकलन करण्याची जबाबदारी मक्तेदाराची राहील.

12. कचरा संकलन व त्याची वाहतुक करण्यासाठी नगर परिषद मालकीचे एकुण 24 वाहने उपलब्ध करून देण्यात येतील. न. प. च्या वाहनाचे भाडे मा.मुख्याधिकारी निश्चित करतील व मिळणा-या देयकातून वसुल करण्यात येईल.

13. नगर परिषद तर्फे थ्रेडर मशिन, बेलिंग मशिन, कन्हवेअर बेल्ट, वजन काटा, इत्यादी उपलब्ध करुन देण्यात येतील. उपलब्ध करुन दिल्या नंतर ते वापरणे बंधनकारक राहील. तसेच तो पर्यंत मक्तेदाराने मजुर लावुन काम करुन घेणे बंधनकारक राहील त्यास अगाऊ देयक मिळणार नाही.




यासह अजून 14 असे एकूण 27 अटी शर्ती गुत्तेतारा घालून देण्यात आले होते मात्र कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नाही हे माहीत असताना देखील. स्वच्छता निरीक्षक यांनी व मुख्य अधिकारी यांनी जुलै 2022 ते नोव्हेंबर 2022 पर्यंत चे देयके दिली आहेत. शहरात स्वच्छता झालीच नाही मग दंड लावून देयके का देण्यात आली. काम न करता गुत्तेदाराला देयके देण्यामागचा उद्देश काय? कोणत्या राजकीय पक्षाच्या दबावाखाली ही देयक देण्यात आली. कोणी कोणी टक्केवारी घेतली अशा वेगवेगळ्या चर्चां उस्मानाबाद धाराशिव शहरात सुरू आहेत. काम करो अथवा न करो काही टक्केवारी दिली की देयके निघतात अशी देखील चर्चा आहे. शहरात स्वच्छता होत नसल्याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे अनेक नागरिकांनी, राजकीय पक्षांनी माहिती वजा निवेदने दिली असताना देखील जिल्हाधिकारी यांनी देखील कोणतीही कारवाई केलेली दिसून आली नाही असेही बोलले जात आहे.





उस्मानाबाद धाराशिव शहरात स्वच्छता होत नाही आठ दिवसात योग्य कारवाई न झाल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता मात्र याचाही देखील कसलाही दखल प्रशासनाकडून घेण्यात आलेली दिसत नाही. शहरात अनेक दिवसापासून शहरातील प्राथमिक सोयी सुविधा मिळत नाहीत याबाबत नागरिक तक्रार करत आहेत मात्र कोणताही पक्ष दखल घेत नाही. श्रेय लाटण्यासाठी काही पक्ष स्टंट करत असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. त्यांनी काय केले ह्यांनी काय केले. हे सांगण्यातच अनेक पक्ष बुद्धी लावताना दिसत आहेत. शहरात स्वच्छता, नागरिक प्राथमिक सुविधा मिळत नसल्यामुळे अनेक नागरिक  सोशल मीडियावर व्यक्त होताना दिसत आहेत माजी नगरसेवक व गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेले भावी नगरसेवक सध्या दिसत नाहीत अशी देखील चर्चा रंगली आहे.


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार खासदार यांनी नगरपरिषद येथे बैठक घेऊन प्रशासनाला सूचना दिल्या होत्या देयके देऊ नका मात्र देयके देण्यात आले आहेत‌. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या काही नेत्यांनी शहरातील स्वच्छतेबाबत आवाज उठवला मात्र काहींनी आपली राजकीय पोळी भाजून घेतली.  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार खासदार यांनी शहरातील समस्या बाबत बैठक तरी लावली मात्र शहरातील माजी पदाधिकाऱ्यांनी तोंडाला चिकटपट्टी लावून शांत का बसले आहेत असा प्रश्न देखील नागरिकांतून उपस्थित होत आहे.




उस्मानाबाद न्यूज चा पोलखोल भाग तीन लवकरच आपल्या साठी प्रकाशित होईल.... 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top