जागर स्त्री शक्तीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन

0
19 ऑक्टोबर रोजी " जागर स्त्री शक्तीचा " या विशेष कार्यक्रमाचे आयोजन

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा पुढाकार 

तुळजापूर येथेही कार्यक्रमाचे आयोजन

उस्मानाबाद - धाराशिव दि.17 (जिमाका) जागर स्त्री शक्तीचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने राज्यात करण्यात येत आहे.18 ते 23 ऑक्टोंबर 2023 या कालावधीमध्ये विविध ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 
               19 ऑक्टोंबर रोजी राज्यातील महसुली विभागाची मुख्यालये व साडेतीन शक्तीपीठे असलेल्या  ठिकाणी महिलांसाठी या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
          आपल्या जिल्ह्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री.तुळजाभवानी तुळजापूर येथील शिवपार्वती मंगल कार्यालय,धाकटे तुळजापूर रोड,तुळजापूर या ठिकाणी 19 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 4 ते 6 या वेळेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. 
            सांस्कृतिक कार्य विभागाने या कार्यक्रमाची सर्व तयारी केली आहे. या कार्यक्रमातून राज्य शासनाच्या महिलाविषयक योजना व सांस्कृतिक कार्यक्रम यांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top