मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून शिंगोली आश्रम शाळेत साजरी

0

मिसाईल मॅन डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून शिंगोली आश्रम शाळेत साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मल्लिनाथ कोणदे, मुख्याध्यापक शिंदे कुमंत, पर्यवेक्षक शेख अब्बास अली यांनी मिसाईल मॅन डॉ एपीजे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पर्यवेक्षक शेख अब्बास आली सरांनी विद्यार्थ्यासमोर आपले विचार मांडले. अपयश आले तरी खचून न जाता परत नव्याने जिद्दीने, कष्टाने प्रयत्न करून यश संपादन केले पाहिजे. आपला भारत देश महासत्ता बनण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरून गरुड भरारी घेतली पाहिजे, देश सेवेसाठी अब्दुल कलाम यांच्यासारखं बनलं पाहिजे. विद्यार्थ्यांचे मनोगत झाली, विद्यार्थी दत्ता धोत्रे, प्रणय कांबळे, अनुष्का आडे . शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. सुनिता व्यवहारे मॅडम, शानिमे मॅडम, विशाल राठोड सर, प्रशांत राठोड सर, कैलास शानिमे  यांनी विज्ञान प्रदर्शनासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन दीपक खबोले  यांनी केले. कार्यक्रमासाठी जाधव चंद्रकांत, सूर्यकांत बडदापुरे, मदन कुमार अमदापुरे, सतीश कुंभार, ज्योती राठोड मॅडम, सूर्यवंशी मॅडम, सुरेखा कांबळे मॅडम, कर्मचारी गोविंद बनसोडे, सचिन माळी, वसंत भिसे, अविनाश घोडके, अमोल जगताप, मस्के मामा व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार श्री खंडू पडवळ सरांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top