तुळजापुरात अन्न व औषध प्रशासन मिशन मोडवर

0
तुळजापुरात अन्न व औषध प्रशासन मिशन मोडवर 

*70  तपासण्या,10 नोटीस आणि अस्वच्छ पेढा नष्ट*

*इतर जिल्ह्यातील अन्न सुरक्षा अधिकारीही शहरात कारवाई करणार*

उस्मानाबाद -धाराशिव, दि 17 (जिमाका) शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त तुळजापूर येथे अन्न व औषध प्रशासन विभाग सध्या मिशन मोडवर काम करून कारवाई करत आहे.भाविकांना स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळावे या हेतूने हॉटेल धाबे आणि स्वीट होम या ठिकाणी पदार्थांचे नमुने घेण्यासाठी तसेच दूषित आढळल्यास कारवाई करण्यासाठी इतर जिल्ह्यातील अन्न सुरक्षा अधिकारी बोलाविण्यात आले आहेत.16 ऑक्टोबर रोजी तुळजापूर शहरातील एकूण 31 अन्न आस्थापना हॉटेल,स्विट मार्ट,नमकीन/फराळ उत्पादक व विक्रेते,खवा व पेढा विक्रेते,किरकोळ व घाऊक अन्न व्यवसायिक यांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. 
             आज 17 ऑक्टोबर रोजी तुळजापूर शहरातील एकूण 39 अन्न आस्थापना हॉटेल,स्विट मार्ट, नमकीन/फराळ उत्पादक व विक्रेते, खवा व पेढा विक्रेते यांच्या तपासण्या करण्यात आल्या. विना परवाना व्यवसाय करणाऱ्या एकूण 9 अन्न व्यवसायिकाना नोटीस देवून परवाना घेईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.तसेच 7 ठिकाणी टिपीसी मीटरद्वारे खाद्यतेलाचे नमुने तपासले असता त्याचे रिडिंग 25 पेक्षा कमी आले आहे.तसेच आज पेढयाचे 4 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले आहे. एका ठिकाणी अस्वच्छ जागेत पेढा साठविल्याचे आढळून आल्याने 20 किलो पेढा, 3 हजार रुपये किमतीचा साठा नष्ट करण्यात आला आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी सु.जि.मंडलिक,स.वि.कनकावाड व ऋ.र.मरेवार यांनी केली. 
      भाविक भक्तांनी अन्न पदार्थाच्या दर्जाबाबत तक्रार असल्यास या कार्यालयाला माहिती देवून सहकार्य करावे. जेणे करून संबंधिताविरुद्ध त्वरित कारवाई करणे शक्य होईल. असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त शि.बा.कोडगिरे यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top