अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान धाराशिव जिल्हा भरात १२ छापे

0



अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात १२ छापे

 

धाराशिव :- पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल बुधवार दि.27.12.2023 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 12 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 4,500 लि. आंबवलेले रासयनिकद्रव्य हे नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आले. तर सुमारे 373 लि. गावठी दारु, सिंधी ताडी अम्ली द्रव 17 लि. असे मद्य जप्त करण्यात आले. सदर ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थासह मद्यनिर्मीती साहित्य व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 3,36,100 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 12 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.

1)बेंबळी पो.ठा. च्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे -1)बाळासाहेब नागनाथ सुरवसे, वय 43 वर्षे, रा. पाटोदा ता. जि. धाराशिव, हे दि.27.12.2023 रोजी 15.00 वा. सु. पाटोदा ते लोहारा जाणारे रोडवर पत्राच्या शेडच्या पाठीमागे ता. जि. धाराशिव, येथे अंदाजे 3,600 ₹ किंमतीची 36 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. 2)नागेराव शंकर पवार, वय 43 वर्षे, रा. रामनगर झोपडपट्टी बेंबळी ता. जि. धाराशिव, हे दि.2712.2023 रोजी 19.45 वा. सु. रामनगर झोपडपट्टी बेंबळी ता. जि. धाराशिव येथे अंदाजे 6,200 ₹ किंमतीचे 62 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. 3)विशाल सुरेश काळे, वय 21 वर्षे, रा. रामनगर झोपडपट्टी बेंबळी ता. जि. धाराशिव, हे दि.27.12.2023 रोजी 20.30 वा. सु. रामनगर झोपडपट्टी बेंबळी ता. जि. धाराशिव येथे अंदाजे 5,500 ₹ किंमतीचे 55 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.

2)वाशी पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे -1)सखुबाई सुब्राव शिंदे, वय 55 वर्षे, रा. चिरकाडवस्ती पारा, ता. वाशी जि. धाराशिव या दि.27.12.2023 रोजी 08.30 वा. सु. चिरकाडवस्ती पारा येथे आपल्या राहात्या घराचे समोरील बाजूस अंदाजे 41,100 ₹ किंमतीचे 500 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 70 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. 2)फुलाबाई आबा शिंदे, वय 45 वर्षे, रा. खैराटवस्ती पारधी पिडी  ता. वाशी जि. धाराशिव, या दि.27.12.2023 रोजी 12.15 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या पाठीमागे अंदाजे 22,100 ₹ किंमतीचे 400 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.

3)मुरुम पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे -1)बाळू शिवाप्पा देडे, वय 35 वर्षे,  रा. महादेव नगर मुरुम जि. धाराशिव, हे दि.27.12.2023 रोजी 18.10 वा. सु. महादेव नगर  मुरुम येथे अंदाजे 10,200 ₹ किंमतीची गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. 2)नागय्या चंद्रय्या गुत्तेदार, वय 68 वर्षे, रा. दाळींब ता. उमरगा जि. धाराशिव, हे दि.27.12.2023 रोजी 16.45 वा. सु. दाळींब येथे आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 8,300 ₹ किंमतीची सिंधी तांडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.

4)उमरगा पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे -1)दत्तात्रय गंगाराम थोरात, वय 64 वर्षे, रा. गुंजोटी, ता. उमरगा जि. धाराशिव, हे दि.27.12.2023 रोजी 17.00 वा. सु. राजेंद्र चौधरी यांचे सलुन च्या दुकानाचे पाठीमागे गुंजोटी येथे अंदाजे 19,000 ₹ किंमतीचे 170 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.

5)लोहारा पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे -1)विजय लक्ष्मण कलमुळे, वय 19 वर्षे, रा. गंवडी प्लॉट लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव, हे दि.27.12.2023 रोजी 19.00 वा. सु. लोहारा येथील बसस्थानकच्या मोकळ्या जागेत अंदाजे 10,400 ₹ किंमतीची सिंधी ताडी अमृली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.

6) आनंदनगर पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे -1)ज्योती मारुती शिंदे,वय 31 वर्षे, रा. शिंगोली सर्किट हाउसचे पाठीमागे शिंगोली  ता. जि. धाराशिव हे दि.27.12.2023 रोजी 14.45 वा. सु. रामनगर सांजा येथे अंदाजे 3,700 ₹ किंमतीचे 25 लि. गावठी दारु व 17 लि. शिंदी ताडी अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.

7) तामलवाडी पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे -1)धोंडीबा बंडु जाधव ,वय 38 वर्षे, रा. खडकी तांडा,  ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.27.12.2023 रोजी 10.30 वा. सु. खडकी शिवारात आपल्या स्वत:चे शेतात अंदाजे 1,80,000₹ किंमतीचे 3,600 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.

8) येरमाळा पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे -1)जनाबाई अशोक शिंदे, वय 25 वर्षे, रा. खामकरवाडी पारधी पिडी ता. वाशी जि. धाराशिव हे दि.27.12.2023 रोजी 13.30 वा. सु. राष्ट्रीय महामार्ग 52 चे सर्वीस रोड लगत खामकरवाडी  पारधी पिडी येथे पत्रयाचे शेडच्या मोकळ्या जागेत अंदाजे 26,000 ₹ किंमतीचे  गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव  अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. अशी माहिती पोलीस विभागाने दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top