शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेची भक्ती संवाद यात्रा धाराशिव जिल्ह्यात
शिंदे सरकारने हाती घेतलेल्या कार्याला संतांच्या कृपेने अधिक बळ मिळेल - प्रदेशाध्यक्ष भोसले
धाराशिव -
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने, खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने भक्ती शक्ती संवाद यात्रा काढण्यात आली आहे. यात्रेत तिसर्या दिवशी शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय (महाराज) भोसले यांनी आज (दि.27) सकाळी तुळजापूर येथे शक्तीदेवता, कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन धाराशिव जिल्ह्यातील मठ, मंदिर, धार्मिक स्थळांमध्ये भक्ती शक्ती संवाद यात्रेस प्रारंभ केला. यावेळी पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या संपर्क कार्यालयास भेट देऊन श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा, दर्शन मंडप, प्रवेशद्वार याबाबत चर्चा केली. तसेच पुजार्यांच्या अडचणीही जाणून घेतल्या. त्यांचे पौरोहित्य पुजारी विनोद सोंजी कदम यांनी केले.
दर्शनानंतर श्री तुळजाभवानी मंदिर प्रशासकीय कार्यालयात प्रदेशाध्यक्ष श्री. भोसले यांनी पुजार्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी बोलताना ते म्हणाले, धर्मसत्तेला राजसत्तेचे पाठबळ पाहिजे. या विचाराने महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये ही संवाद यात्रा काढण्यात येत आहे. साधू, संतांच्या आशीर्वादाने निश्चित महाराष्ट्राचे सुराज्य होईल, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका आहे. शिंदे सरकारने हाती घेतलेल्या विहित कार्याला संतांच्या कृपेनेच अधिक बळ मिळेल ही आमची श्रद्धा आहे. असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केेले. यावेळी पुजार्यांनी अनेक समस्या त्यांच्यासमोर मांडल्या. त्या तत्काळ मार्गी लावू असे मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने त्यांनी पुजार्यांना आश्वासित केले. भक्ती शक्ती यात्रा हा केवळ दौरा नसून संवाद यात्रा आहे. यातून समाजाच्या हिताचे निर्णय तात्काळ व्हावेत हा याचा मुख्य हेतू असल्याचेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी श्री.अक्षय (महाराज) भोसले यांचं तुळजापूर नगरीत स्वागत करण्यात आले.
यावेळी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक (प्रशासन) तथा तहसिलदार सोमनाथ माळी, शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम, जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, मोहन पणुरे, उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, तालुकाप्रमुख संभाजी पलंगे, शहराध्यक्ष बापू भोसले, युवासेना उपजिल्हाप्रमुख सुरज कोठावळे, उपतालुकाप्रमुख खंडू कुंभार, मोहन भोसले, अभिजित अमृतराव, भक्ती शक्ती संवाद यात्रेचे जनसंपर्क अधिकारी श्री.भोसले उपस्थित होते.
बुधवारी (दि.27) तुळजापूर येथे दर्शनानंतर मंदिरातील पुजारी व हिंदु समाजबांधवांशी संवाद साधला. त्यानंतर खंडोबा मंदिर (अणदूर), संत मारुती महाराज मंदिर (कानेगाव), अचलबेट देवस्थान (तुरोरी), श्री काळभैरवनाथ मंदिर (सोनारी), महादेव मंदिर (माणकेश्वर), अलमप्रभू देवस्थान (भूम), महादेव मंदिर (खानापूर), येडेश्वरी मंदिर (येरमाळा), संत गोरोबा काका मंदिर व जैन मंदिर (तेर), धारासूरमर्दिनी मंदिर (धाराशिव) येथे संवाद यात्रा काढून संत, वारकरी, पुजारी यांच्यासमवेत बैठक घेऊन चर्चा केली.