खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड.

0धाराशिव स्थानिक गुन्हे शाखा मयत नामे- समाधान नानासाहेब पाटील, रा. पाठसांगवी ता. भुम जि. धाराशिव यांचा दि. 07.05.2024 रोजी 11.15 वा. सु. बसस्थानक पाठसागंवी येथे आरोपी नामे-1)आप्पाराव भिमराव नाईकनवरे, 2) राजकुमार भिमराव नाईकनवरे, 3) दत्तात्रय भिमराव नाईकनवरे, 4) गौरव आप्पाराव नाईकनवरे सर्व रा.पाठसांगवी ता. भुम जि. धाराशिव यांनी भारत चंद्रशेखर पाटील याला बसस्थानक पाठसांगवी येथे का मारले असे विचारण्यासाठी गेल्याचे कारणावरुन आरेापी गौरव नाईकनवरे यांनी मयत समाधान पाटील याचे पोटात डाव्या बाजूस चाकु मारुन जिवे ठार मारले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शंकर शरद शिंदे, वय 27 वर्षे, रा. पाठसांगवी ता. भुम जि. धाराशिव यांनी जगदाळेमामा हॉस्पीटल येथे उपचार दरम्यान दि. 07.03.2024 रोजी दिलेल्या जबाबावरुन भा.दं. वि. सं. कलम- 302, 326, 34 अन्वये भुम पो.ठा. येथे गुन्हा क्र. 119/2024 हा नोंदवला आहे.

            सदर गुन्ह्यातील तपासा दरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक श्री वासुदेव मोरे यांचे ओदशावरुन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सचिन खटके, श्री अमोल मोरे, पोहेकॉ/530 अमोल निंबाळकर, पोहेकॉ/327 विनोद जानराव, पोना/ 1479 नितीन जाधवर, पोना/1611 बबन जाधवर, पोना/1631 अशोक ढागारे, पोकॉ/1819 रवींद्र आरसेवाड, चालक पाहेकॉ/1248 अरब, चालक पोहेकॉ/67 विजय घुगे, चालक पोकॉ/564 प्रशांत किवंडे असे दोन पथके रवाना झाले. पथकास गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, नमुद गुन्हन्यातील आरोपी हे कुर्डवाडी येथे आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळल्यावरुन पथकाने लागलीच त्याठिकाणी जावून आरोपी नामे- गौरव आप्पा नाईकनवरे, वय 21 वर्षे, आप्पा भिमराव नाईकनवरे, वय 47 वर्षे, रा. पाठसांगवी ता. भुम जि. धाराशिव यांना ताब्यात घेतले. तसेच राजकुमार भिमराव नाईकनवरे, वय 43 वर्षे रा. पाठसांगवी ता. भुम जि. धाराशिव यास बीड येथुन ताब्यात घेवून नमुद तीन आरोपी यांच्याकडे गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता त्यांनी सागिंतले समाधान पाटील यांचे पोटात चाकू मारुन गंभीर जखमी करुन जिवे ठार मारले व तेथून निघून गेलो अशी गुन्ह्याची कबुली दिल्यावरुन सदर गुन्‌ह्यातील इसम नामे 1)गौरव आप्पा नाईकनवरे, वय 21 वर्षे, 2)आप्पा भिमराव नाईकनवरे, वय 47 वर्षे, 3) राजकुमार भिमराव नाईकनवरे, वय 43 वर्षे तिघे रा. पाठसांगवी ता. भुम  जि. धाराशिव यांना पुढील कार्यवाही कामी पो स्टे भुम येथे हजर केले.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक- श्री. वासुदेव मोरे, सपोनि- श्री. अमोल मोरे, श्री. सचिन खटके, पोहेकॉ/अमोल निंबाळकर, विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, अशोक ढगारे, पोकॉ/रविंद्र आरसेवाड, चालक पाहेकॉ/ अरब विजय घुगे, चापोकॉ/ किवंडे यांच्या पथकाने केली आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)