माजी खासदार रविंद्र गायकवाड यांनी जातीवाचक अपशब्द वापरुन धार्मिक भावना दुखावल्यावरुन गुन्हा नोंद होणे बाबत पोलीस अधीक्षकांना मुस्लिम समाजाचे निवेदन

0
 
धाराशिव : माजी खासदार रविंद्र गायकवाड (उमरगा) यांनी जातीवाचक अपशब्द वापरुन धार्मिक भावना दुखावल्यावरुन गुन्हा नोंद होणे बाबत पोलीस अधीक्षक यांना मुस्लिम समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात  म्हटले आहे की दि. 05/05/2024 रोजी सायंकाळी शिवाजी चौक, उमरगा येथे लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार सभेत माजी खासदार श्री. रविंद्र गायकवाड, रा. उमरगा याने जिल्हयात अत्यंत शांतपणे चाललेल्या लोकसभेच्या प्रचारादरम्यान जाणुनबुजुन शांतता भंग करण्याच्या हेतुने समाजा- समाजामध्ये जातीय तेढ निर्माण व्हावे या हेतुने भरसभेत मुस्लीम समाज व मौलवी यांच्याबद्दल खालच्या दर्जात अपशब्द वापरुन जिल्हयातील व समस्त मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखविल्या आहेत. श्री. रविंद्र गायकवाड यांची नेहमीच मुस्लीम समाजाबद्दल द्वेषाची भावना असुन यापुर्वी सुध्दा त्यांनी खासदार असताना नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाच्या मॅनेजर असलेल्या मुस्लीम समाजातील व्यक्तीवर रोजा असताना रोजा तोडण्याच्या हेतुने तोंडात चपाती टाकली होती त्यावेळी सुध्दा पुर्ण भारतामध्ये या घटनेचा जाहीर निषेध समाजातील लोकांनी केला होता. अशी व्यक्ती समाजामध्ये नेहमीच घातक असुन याला कायदेशीर अद्दल घडणे आवश्यक आहे. म्हणुन अशा व्यक्ती विरुध्द कठोरात कठोर कायदेशीर कार्यवाही होणे गरजेचे आहे.

तरी आम्ही आज रोजी आपणास प्रत्यक्ष भेटुन तक्रारी अर्ज देऊन विनंती करत आहोत की, दि. 05/05/2024 रोजी सदरील माजी खासदार रविंद्र गायकवाड यांनी जाणुनबुजुन समाजामध्ये दुरी निर्माण करण्याच्या हेतुने मुस्लीम समाज, त्यांची दाढी व्यवस्था व मौलवी यांना खालच्या दर्जात अपशब्द वापरुन पुर्ण मुस्लीम समाजाची धार्मिक भावना दुखविल्या आहेत तरी त्यांचेवर गुन्हा नोंद होणे संबंधी संबंधीत पोलीस स्टेशन यांना आदेश द्यावेत ही विनंती जेणेकरुन समाजात शांतता राहील. असे दि ९ मे रोजी  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर मसुदा शेख, खादर खान, अयाज शेख, बाबा मुजावर, एजास काझी, अनवर शेख, बिलाल तांबोळी, वाजीद खान, इम्रान पठाण, हसीब काझी, गयाजोद्दीन काझी, अफरोज पिरजाह, काझी मुझमील , शेख इब्राहिम यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top