बकरी ईदनिमित्त जिल्ह्यात ७ जून रोजी सर्व मद्यविक्री दुकाने राहणार बंद

0

🗓 ३ जून २०२५ | धाराशिव 

बकरी ईद (ईद-उल-अझहा) सणाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यात ७ जून २०२५ रोजी सर्व देशी व विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार आहेत. सार्वजनिक शांतता nowशांती व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी हा आदेश जारी केला आहे.

महाराष्ट्र दारुबंदी कायदा, १९४९ चे कलम १४२ (१) नुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करत, जिल्हाधिकाऱ्यांनी एक दिवसासाठी पूर्ण जिल्ह्यात मद्यविक्री बंदीचे आदेश लागू केले आहेत. या दिवशी कोणतीही देशी किंवा विदेशी मद्यविक्री सुरू आढळल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकाविरोधात कडक कारवाई केली जाईल, अशी स्पष्ट सूचना प्रशासनाने दिली आहे.

🔸 आदेशाचे उल्लंघन केल्यास मद्यविक्री अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द होण्याची शक्यता असल्याने सर्व अनुज्ञप्तीधारकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top