google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 स्वातंत्र्य दिनी उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी-कर्मचारी व विद्यार्थी सन्मानित

स्वातंत्र्य दिनी उत्कृष्ट कार्य करणारे अधिकारी-कर्मचारी व विद्यार्थी सन्मानित

0


धाराशिव, दि.15 ऑगस्ट 

79 वा भारतीय स्वातंत्र्य दिन जिल्ह्यात आज उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.यावेळी विविध विभागात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी,कर्मचारी तसेच शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक यांच्या हस्ते सन्मानचिन्ह,प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले.

 

कार्यक्रमाला स्वातंत्र्यसैनिक भास्करराव नायगावकर,खासदार ओमप्रकाश

राजेनिंबाळकर,मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार कैलास घाडगे,माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,पोलिस अधिक्षक शफकत आमना,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, जि.प.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी अुनप शेंगुलवार,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

29 सप्टेंबर 2020 रोजी चकमकीत शहीद झालेल्या झालेले नायक वामन मोहन पवार यांच्या वीर पत्नी श्रीमती वैशाली वामन पवार यांना ताम्रपट देवून सन्मानित करण्यात आले.

 

100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांच्या विशेष म्हणून दुसरा टप्पा निवड झालेल्या कार्यालयांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून प्राप्त प्रशस्तीपत्र यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते कार्यालय प्रमुखांना प्रदान करण्यात आले.

 

हरित धाराशिव अभियान 2025 अंतर्गत दुरुस्त कामगिरी केलेल्या विभागांना सन्मानित करण्यात आले.हरित धाराशिव अभियान 2025 अंतर्गत एकाच दिवशी 15 लक्ष वृक्ष लागवड करून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेमध्ये संस्थेने कन्फर्मेशन प्रमाणपत्र देऊन गौरव केल्याबद्दल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रवीण धरमकर, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनाधिकारी विश्‍वास करे व जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात यांचा सन्मान करण्यात आला.हरित धाराशिव अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या नगर पालिका व ग्रामपंचायतींचाही सन्मान करण्यात आला.

 

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळामध्ये मराठवाड्यातील सर्व विभागातील 25 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीमध्ये विनाअपघात सेवा केलेल्या चालकांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.पूर्व उच्च माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता परीक्षा पुरस्कार राज्यस्तरीय गुणवत्ता यादी स्थान मिळाल्याबद्दल,स्पेलिंग बी उपक्रमातील विद्यार्थ्यांना, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हयातील अवयवदात्यांच्या नातेवाईकांचा,जिल्हा परिषद पंचायत विभागातंर्गत येत असलेल्या ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचा,कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचा,पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही पालकमंत्री श्री.सरनाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top