google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून आकांक्षित जिल्ह्याचा शिक्का मिटवण्यासाठी सर्वजण एकत्र येऊया पालकमंत्री प्रताप सरनाईक

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून आकांक्षित जिल्ह्याचा शिक्का मिटवण्यासाठी सर्वजण एकत्र येऊया पालकमंत्री प्रताप सरनाईक

0

७९ वा भारतीय स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात

धाराशिव,दि.१५ ऑगस्ट (जिमाका) जिल्ह्याचे मागासलेपण ओळखून केंद्र सरकारने जिल्ह्याचा समावेश आकांक्षित जिल्ह्यात केला आहे.केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची स्क्षुम नियोजनातून आणि प्रभावी अंमलबजावणी करुन आकांक्षित जिल्हा म्हणून लागलेला शिक्का मिटवण्यासाठी सर्वजण एकत्र येऊया.असे आवाहन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

आज ७९ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.यावेळी स्वातंत्र्यसैनिक भास्करराव नायगावकर, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, मित्राचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील,आमदार कैलास घाडगे,माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,पोलिस अधिक्षक शफकत आमना,अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील, जि.प.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी अुनप शेंगुलवार,निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव,उपजिल्हाधिकारी सर्वश्री शिरीष यादव,प्रविण धरमकर,संतोष राऊत,अरुणा गायकवाड,जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकुरकर, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता विजय थोरात,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.शैलेश चौहान,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे,सामाजिक वनीकरणचे विभागीय वनाधिकारी विश्वास करे, जि.प.चे मुख्य वित्त व लेखा अधिकारी सचिन इगे,राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. सरनाईक बोलताना पुढे म्हणाले की,जिल्ह्याचे वनक्षेत्र हे १ टक्क्यापेक्षाही कमी आहे.जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी जिल्ह्याचे वनक्षेत्र वाढले पाहिजे यासाठी पुढाकार घेतला आणि हरित धाराशिव अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात एकाच दिवशी १९ जुलैला १५ लक्ष वृक्षलागवडीचा संकल्प करुन तो प्रत्यक्षात देखील आणला.त्याची दखल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड,एशिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यांनी घेतली.या वृक्षलागवड मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त होता.एक नवा विक्रम जिल्ह्याने या मोहिमेत नोंदविला आहे.या विक्रमाबद्दल पालकमंत्री यांनी धाराशिवकरांचे अभिनंदन केले.

चालू वर्षामध्ये जिल्ह्यातील ३४१ शेतरस्ते अतिक्रमणमुक्त करण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री श्री.सरनाईक पुढे म्हणाले की, या शेतरस्त्यांचा जवळपास ६ हजार ५०० शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. जिल्हयातील ३ लक्ष ४६ हजार ६७८ शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकची नोंदणी केली आहे.ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही नोंदणी केली नाही,त्या सर्व शेतकरी बांधवांनी नोंदणी करण्याचे आवाहन श्री.सरनाईक यांनी याप्रसंगी केले.ते पुढे म्हणाले की,एप्रिल व मे २०२५ मध्ये आलेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे बाधित ११ हजार २८० शेतकऱ्यांना ९ कोटी रुपये निधी मंजूर केला असून बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु आहे. ऑक्टोबर २०२४ च्या नैसर्गिक आपत्तीचे ८६ कोटी रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री श्री.सरनाईक पुढे म्हणाले, जिल्हाधिकारी कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वीत करण्यात आली आहे. ई-ऑफीस प्रणाली कामकाजात धाराशिव जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे.तो पहिल्या क्रमांकावर यावा यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावे,अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.ते पुढे म्हणाले,जिल्हयात ३३० गावांमध्ये दहन व दफनभूमीच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन २०२३-२४ मध्ये २६ कोटी ४० लक्ष रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात आला.त्यामुळे २६८ दहनशेड बांधकामे पूर्ण झाली आहेत. असे सांगितले.

१५० दिवसांच्या कृती आराखड्यामध्ये धाराशिव जिल्हा प्रशासनाने कार्यक्षमता वाढविण्यासाठी कल्पवृक्ष ॲप, नागरीकांच्या समाधानासाठी तुळजाई-धाराशिव हेल्पलाईन ॲप, जिल्हयातील प्रकल्पांसाठी कार्यसिध्दी ॲप,जिल्हयातील शेतकऱ्यांच्या अतिक्रमणाच्या समस्या नोंदविणे,देखरेख व समस्या निवारणासाठी जीवनरेखा ॲप विकसीत केल्याचे सांगून श्री.सरनाईक म्हणाले की,या ॲपमुळे नागरीकांची संबंधित कामे वेगाने होण्यास मदत होत आहे. जिल्हयातील ४ लक्ष ७ हजार ४६ पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये लाडकी बहिण योजनेचा लाभ देण्यात येत असल्याचे सांगितले.
       
अवयवदान मोहिमेअंतर्गत ३२४१ नागरीकांनी अवयवदान करण्याचे संमतीपत्र दिले असल्याचे सांगून श्री.सरनाईक म्हणाले,प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ६५ हजार ९३६ घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे. रमाई आवास योजनेची १४ हजार ३४४ घरकुले,शबरी आवास योजनेची ३४३ घरकुल आणि मोदी आवास योजनेची १०४७ घरकुले पूर्ण करण्यात आली असून उर्वरित घरकुलांची कामे विविध टप्प्यांवर सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागाकडुन एप्रिल-२०२४ ते मार्च-२०२५ या कालावधीत ९७ हजार ४५२ विद्यार्थ्यांना, महिला सन्मान योजनेअंतर्गत १ कोटी ३३ लक्ष ९४ हजार महिलांना,६५ ते ७५ वर्षाच्या आतील १६ लक्ष ४० हजार ८५८ ज्येष्ठ नागरीकांना,७५ वर्षावरील १ कोटी २६ लक्ष ५ हजार ८१० अमृत ज्येष्ठ नागरीकांना प्रवास सवलतीचा लाभ देण्यात आला आहे.प्रवाशांच्या सुखकर व आरामदायी प्रवासासाठी धाराशिव विभागास ५५ नवीन लालपरी बस आणि प्रदुषण विरहीत ५ ई-बस प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करुन देण्यात आल्याचे श्री.सरनाईक यांनी सांगितले.

सन २०२५ - २६ च्या खरीप हंगामात ४ लक्ष ५५ हजार २०६ शेतकरी अर्जदारांनी ४० कोटी ६८ लक्ष रुपयांचा विमा हप्ता भरुन ३ लक्ष ६४ हजार ७८२ हेक्टर क्षेत्र संरक्षित केले असल्याचे सांगून श्री.सरनाईक पुढे म्हणाले,प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सन २०१९ ते २०२५ पर्यंत ४८ लक्ष ५१ हजार ४६० लाभार्थ्यांना १ ते १९ हप्त्याचा लाभ देण्यात आला आहे.ही रक्कम ९६४ कोटी १२ लक्ष रुपये इतकी आहे.२० जुलै २०२५ रोजी २ लक्ष ३८ हजार ५७१ लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ४७ कोटी ७२ लक्ष रुपयांचा २० व्या हप्त्याची रक्कम जमा करुन लाभ दिला आहे.धाराशिव येथे ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय तसेच २०० खाटांच्या धाराशिव येथील स्त्री रुग्णालयास देखील शासनाने मंजूर दिली असल्याचे ते म्हणाले.

जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत ५५ उद्योजकांशी सामंजस्य करार करण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री श्री.सरनाईक म्हणाले की,यामधून ११४२ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून जवळपास २१९७ रोजगार निर्मिती यामधून होण्यास मदत होणार आहे.हिमोफिलिया या आजारावरील जगातील पहिला आयुर्वेद संशोधन प्रकल्प रक्तामृत इन हिमोफिलिया रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट सेल या नावाने आयुर्वेद महाविद्यालय येथे सुरु करण्यात आला आहे.संशोधक डॉ.शुभम धुत यांच्या अथक संशोधनातून हा प्रकल्प साकारला आहे.त्यामुळे हिमोफिलिया रुग्णांना रक्तामृत वटीमुळे दिला मिळण्यास मदत होणार आहे.जगभरातील या रुग्णांसाठी हा प्रकल्प आशेचा किरण व आयुर्वेद संशोधनात ऐतिहासिक ठरणार असल्यामुळे त्यांनी आयुर्वेद महाविद्यालय व डॉ.शुभम धुत यांचे अभिनंदन केले.

प्रारंभी पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी ध्वजारोहण करुन स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले.पोलिस बॅन्ड पथकाने राष्ट्रगीताने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.राज्यगीत सादर केले.यावेळी विविध विभागात उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाला स्वातंत्र्यसैनिकांचे वारस,विविध क्षेत्रातील मान्यवर,विविध विभागाचे अधिकारी - कर्मचारी,नागरिक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top