राज्यातील कामगारासाठी आरोग्य तपासणी करणाऱ्या व्हॅन चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

0

मुंबई दि 9 :बांधकाम कामगार,सुरक्षा रक्षक, माथाडी कामगार ,कंपनी मधील कामगार व इतर क्षेत्रातील संघटीत व असंघटित कामगार याकरिता वर्षातून एकदा मेडिकल चेकपक होणे आवश्यक आहे या करिता या चालते बोलते रूग्णालाय बसचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले.
ओम गगनगिरी हॉस्पिटल व ऑक्युपेशनल हेल्थ सर्विसेस सर्विसेस  कोपरखैरणे यांच्या भारतातील तिसऱ्या डिजिटल हेल्थ चेकअप बस चे लोकार्पण व अनावरण माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते आज सह्याद्री शासकीय गेस्ट हाउस येथे संपन्न झाले.
सदर डिजिटल बस महाराष्ट्रातील असंघटित कामगार माथाडी कामगार इमारत व इतर बांधकाम कामगार तसेच एसटी महामंडळातील  कामगार यांच्या आरोग्य तपासणी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात फिरणार आहे सदर बस मध्ये अद्ययावत अशा डिजिटल एक्स-रे, डिजिटल ऑडिओ मेट्री डोळ्यांची तपासणी ,बहिरेपणाची तपासणी फुफुसाची तपासणी तपासणी व रक्ताच्या विविध तपासण्या ह्या कामगार काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन करणार आहे.
आतापर्यंत सदर बस मध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये सात लाख विविध ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची तपासणी करण्यात आलेली आहे.
यावेळी परिवहनमंत्री अनिल परब आमदार रवींद्र वायकर ,ज्ञानराज चोंघुले आदी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top