उस्मानाबाद :- लोक सहभागातून उभी करण्यात आलेल्या उस्मानाबादच्या लॅबचे आज दुपारी साडेबारा वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने उदघाटन होणार आहे .
१ कोटी २० लाखांचा निधी लोकांनी जमा करून लॅब उभी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्यातील पहिल्या नाॅन मेडीको आरटीपीसीआर लॅबला मान्यता मिळाली आहे. नागपूर येथील
अखिल भारतीय आयुविज्ञान संस्थे कडून ही मान्यता मिळाली आहे.
आज पासून चाचण्या सूरू होतील
रोज ६०० तपासण्या या लँब मध्ये होवू शकतात.