वृंदावन नगरमध्ये पाणी साचले मुख्याधीकाऱ्यांना पक्क्या पुलासाठी नागरीकांचे निवेदन

0
इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. पावसाळा सुरु होऊन महीना उलटला तरी मोठा पाऊस येत नव्हता. पहिल्यांदाच नाल्यामार्गे पाणी वाहत असल्याचे दिसुन आले. उमरगा शहारातील मलंग प्लॉट येथील वृंदावन नगर येथे नदीचे स्वरूप प्राप्त झाले. पाऊस छोटा आला तरी याठीकाणी दुरुन पाणी येत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. याठीकाणी पाण्याचा दाब इतका मोठा असतो की, यापुर्वी छोटा पुल वाहुन गेला होता. व त्यातील सिमेंटचे मोठे पाईप दुरपर्यंत वाहुन गेले होते. 
यापुर्वी मोठ्या पावसामुळे अनेकदा शहराशी संपर्क तुटला होता. कॉलनीत सध्या पक्के रस्ते होत असून दोन ठिकाणी छोट्या पक्क्या पुलाची आवश्यकता आहे. गुरुवारी (ता.२३) रोजी वृंदावन नगर येथील नागरीकांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन पक्क्या पुलाची मागणी केली आहे. या निवेदनावर दत्तु वडदरे, राजकुमार दुधनाळे, युसुफ मुल्ला, भरत चौधरी, शिवकुमार दळवी, रमेश पवार, शिवराम जाधव, अॅड. बाळासाहेब लुल्ल, राजेंद्र गणापुरे, अविनाश माळी, जयदीप कुलकर्णी, बी.एस. हंगरगे, धनराज देशमुख, दत्तात्रय जवळगे, शैलेश बिराजदार , सुनिल जगदाळे, सुदाम सुर्यवंशी , सुरेश निंगशेट्टी, महेश हेबळे, सुधिर कुरुम, रविंद्र मुरुमकर, समाधान पसरकल्ले आदींच्या सहया आहेत.

---------------------
वृंदावन नगर येथे पक्क्या रस्त्याचे काम सुरु आहे. शहरात जाण्यासाठी सोईचे असलेल्या ठिकाणी पुल नसल्याने नागरीकांना अडचण होणार असुन पुल होणे आवश्यक आहे. 
--- दत्तु वडदरे, उमरगा
----------------------------
या नाल्यात डिग्गी रोडपासुन पाणी येत असुन अनेक वेळा घरात पाणी शिरले आहे. पक्का पुल न झाल्यास पाण्याने पक्क्या रस्त्याचे नुकसान होऊ शकते
------ भरत चौधरी, उमरगा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top