दहावी-बारावी नंतर पुढे काय? याबाबत दि. 13 ऑगस्ट रोजी वेबिनारचे आयोजन
उस्मानाबाद,दि.07(जिमाका):-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,उस्मानाबाद अंतर्गत मॉडेल करिअर सेंटर,नॅशनल करिअर सर्व्हिस भारत सरकार च्या उपक्रमांतर्गत उस्मानाबाद जिल्हयातील दहावी,बाराबी उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय? याबाबत विद्यार्थ्यांसाठी विविध क्षेत्रातील करिअरच्या संधीबाबत मोफत ऑनलाईन करिअर मार्गदर्शन व समुपदेशन सत्राचे वेबिनार आयोजित करण्यात आलेले आहे.या ऑनलाईन सत्रास प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.अनिल जाधव,यंग प्रोफेशनल,मॉडेल करिअर सेंटर,उस्मानाबाद हे संबोधित करणार आहेत.
सदरील वेबिनार दि.13 ऑगस्ट-2020 रोजी वेळ दुपारी 12.00 ते 01.00 या वेळेत Google Meet च्या माध्यमातून होणार असून सदरील ऑनलाईन वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी https://meet.google.com/shq-ftgg-fyd या लिंकचा वापर करुन जास्तीत जास्त विद्यार्थी/पालकांनी आणि इच्छुकांनी सहभाग नोंदवावा.असे आवाहन सहायक आयुक्त कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,उस्मानाबाद यांनी केलेले आहे.अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दुरध्वनी क्र.02472-222236 वर संपर्क साधावा.