उस्मानाबाद- जिल्हा हा मागासलेला जिल्हा आहे. जिल्हा नीति आयोगाच्या आकांक्षित जिल्ह्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच जास्त आत्महत्या ग्रस्त शेतकरी जिल्हा आहे. येथिल विद्यार्थ्यांना पुणे - मुंबई ठिकाणी जाऊन स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे परिस्थितीच्या अभावी शक्य होत नाही. बौद्धिक क्षमता असताना देखील केवळ आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा उत्तीर्ण होण्यास मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत.
धाराशिव (उस्मानाबाद ) येथिल डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्र परिसरात 200 विद्यार्थी क्षमतेचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ग्रंथालय व वसतिगृहाची उभारणी करण्यात यावी याबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा.ना.उदयजी सामंत साहेब यांची भेट घेऊन खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील यांनी मागणी करण्यात आली आहे. यावर मंत्री महोदयांनी सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती खासदार ओमराजे निंबाळकर फेसबुक पेजवर वर दिली आहे