उस्मानाबाद शहरात मोहल्ला क्लिनिक क्रमांक चार चे पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या हस्ते उदघाटन..

0
उस्मानाबाद शहरात मोहल्ला क्लिनिक क्रमांक चार चे पोलिस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या हस्ते उदघाटन..


उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड- 19 चा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या संकल्पनेतून मुस्लिम समाजाच्या पुढाकाराने उस्मानाबाद शहरात मोहल्ला क्लिनिक उभारण्यात येत आहेत उस्मानाबाद शहरातील मोहल्ला क्लीनिक क्रमांक चार चे उद्घाटन जिल्ह्याचे कार्यदक्षक पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या हस्ते करण्यात आले व या कार्यक्रमाचे
अध्यक्ष म्हणून जिल्ह्याच्या नविन अतिरिक्त जिल्हाधिकारी रूपालीताई आवळे उपस्थित होते

मोहल्ला क्लिनिक मध्ये सर्व प्रकारचे प्रथम उपचार केंद्र म्हणून कार्य करणाऱ आहेत शहरात नागरिकांना पुढे येऊन प्रत्येक भागात या प्रकारे प्राथमिक उपचार केंद्रे उभारावीत प्रत्येक अजार लवकरात लवकर लक्षात येईल व त्याच्या वर उपचार करणे सोपे होईल व शहरात मुस्लिम समाजाचे कोरन्टाईन सेंटर उभा करण्यात आले आहेत व 15 ऑगस्ट पर्यंत सर्वांच्या  मदतीने हॉस्पिटल ही सुरू होईल अशी माहिती समाज सेवक मसूद शेख 
यांनी या वेळी दिली ..

नागरिकांनी कोणतेही छोटे छोटे रोग न लपवता निर्भिड पणे उपचारासाठी पुढे यावे असे आव्हान अतिरिक्त जिल्हाधिकारी रूपालीताई आवळे यांनी यावेळी  केले.

यावेळी शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष नंदुभैय्या निंबाळकर  यांनी यावेळी बोलताना म्हणाले  मोहल्ला क्लीनिक ला लागणाऱ्या सर्व प्रकारचे औषध गरज पडल्यास नगरपालिकेच्या  निधीतून उपलब्ध करून देऊ फक्त नागरिकांनी  मोहल्ला क्लीनिक मध्ये येऊन आपली तपासणी करून घेणे गरजेचे आहे लहान लहान  रोगाच्या समस्या काही काळानंतर  मोठ्या समस्या निर्माण करतात त्यामुळे नागरिकांनी यांची काळजी घ्यावी असे आवाहन नगराध्यक्ष यांनी केले आहे ..

 या वेळी संजय मामा निंबाळकर डाँक्टर शकिल अहेमद , उस्मानाबाद चे तहसिलदार गणेश माळी ,  जेष्ठ राजकीय नेते व समाजसेवक मसुद भाई शेख , डाँ कादरी , माजी नगरसेवक मैनुद्दीन पठाण , नगर सेवक ईस्माईल शेख,बाबा मुजावर , इम्तियाज बागवान , असलम सय्यद , खलील सय्यद , अजहर सय्यद ,आयाज शेख , बाबा फैजोद्दीन व शहरातील सामाज सेवक राजकीय क्षेञातिल मान्यवर धर्म गूरु व  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top