उस्मानाबाद जिल्ह्यात आज 4 सप्टेंबर 2020 रोजी दाखल गुन्हे व कारवाया ..

0

“नाकाबंदी दरम्यान 202 कारवाया- 38,600 ₹ ‘तडजोड शुल्क प्राप्त.”

उस्मानाबाद जिल्हा: कोविड- 19 च्या प्रसारास प्रतिबंध व्हावा या उद्देशाने विविध मनाई आदेश लागू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील महत्वाच्या रस्त्यांवर वाहतुक शाखेच्या सहकार्याने दि. 03.09.2020 रोजी नाकाबंदी दरम्यान मोटार वाहन कायदा अंतर्गत 202 कारवाया करण्यात आल्या असुन त्यातून 38,600 ₹ ‘तडजोड शुल्क’ प्राप्त झाले आहे.

“मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 3 व्यक्तींकडुन प्रत्येकी 200/-रु. दंड वसुल.”

पोलीस ठाणे, वाशी: कोविड- 19 संबंधीच्या मनाई आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द वाशी पो.ठा. यांनी दि.03.09.2020 रोजी खालील प्रमाणे दंडात्मक कारवाया केल्या आहेत.

1)सार्वजनिक स्थळी थुंकणे: 1 कारवाईत- 200/- रु. दंड प्राप्त.

2)सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीत सुरक्षीत अंतर न राखणे: 2 कारवायांत 400/-रु. दंड प्राप्त.

 

“जुगार विरोधी कारवाई.”

पोलीस ठाणे, कळंब: जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन कळंब पो.ठा. च्या पोलीसांनी काल दि. 03.09.2020 रोजी 15.20 वा. मौजे मस्सा शिवारातील आश्रुबा फरतडे यांच्या शेतातील शेडमध्ये छापा मारला. यावेळी 1)संजीवन जाधव 2)सुधाकर पवार 3)आश्रुबा मोटे, तीघे रा. मस्सा, ता. कळंब 4)तानाजी पवार, रा. मंगरुळ हे सर्वजण तिरट जुगार खेळत असतांना जुगाराच्या साहित्यासह रोख रक्कम 6,400/-रु. बाळगले असतांना पोलीसांना आढळले.

 

पोलीस ठाणे, तामलवाडी: हणुमंत काशीनाथ साळुंके, रा. काटी, ता. तुळजापूर हा दि. 03.09.2020 रोजी गावातील दत्त चोकात एका झाडाखाली कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रोख रक्कम 500/-रु. बाळगलेला पो.ठा. तामलवाडी यांच्या पथकास आढळला.

यावरुन नमूद व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

 

“अवैध मद्य विरोधी कारवाई”

पोलीस ठाणे, मुरुम: नाथा भाउराव सावंत, रा. येडोळा, ता. तुळजापूर हे दि. 04.09.2020 रोजी मौजे अचलेर येथील रस्त्याने सीबीझेड मोटारसायकलवरुन एका रबरी नळीमध्ये 37 लि. गावठी दारुची (किं.अं. 3,700/-रु.) अवैधपणे वाहतुक करत असतांना पो.ठा. मुरुम यांच्या पथकास आढळला. यावरुन पथकाने नमूद गावठी दारु व वाहतुकीस वापरलेली मो.सा. जप्त करुन नाथा सावंत याच्याविरुध्द म.दा.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

  “गुटखा- सुगंधी तंबाखुची वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”

पोलीस ठाणे, मुरुम: मुरुम पो.ठा. चे पथक दि. 04.09.2020 रोजी पहाटे 04.30 वा. सु. रात्रगस्त करत होते. यावेळी मुरुम- अक्कलकोट रस्त्यावरील कंटेकुर मोड येथे अनिल पांडुरंग कांबळे उर्फ अमोल, रा. चुंगी, ता. अक्कलकोट हा मो.सा. क्र. एम.एच. 13 एबी 3937 वरुन पोते वाहुन नेत असलेला दिसला. पोलीसांना पाहुन तो मोटारसायकल व पोते जागेवर सोडून अंधारात पसार झाला. पोलीसांना त्या पोत्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा, सुगंधी तंबाखु असा 31,200/-रु. चा माल आढळला. अशा प्रकारे अनिल कांबळे याने प्रतिबंधीत पदार्थ बाळगुन मनाई आदेशांचे उल्लंघन केले. यावरुन पोना- अमर महानुरे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 272, 273 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

  “चोरी.”

पोलीस ठाणे, तुळजापूर: शैलेश दत्तात्रय माडजे, रा. तिर्थ (बु.), ता. तुळजापूर यांनी दि. 22.08.2020 रोजी आपल्या राहत्या घरासमोर लावलेली होंडा ड्रीमयोगा मो.सा. क्र. एम.एच. 25 झेड 1807 ही मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशा मजकुराच्या शैलेश माडजे यांनी दि. 04.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नांदवला आहे.

 

पोलीस ठाणे, तुळजापूर: सागर सुरेश साळुंके, रा. छत्रपतीनगर, तुळजापूर यांनी दि. 20.08.2020 रोजी आपल्या राहत्या घरासमोर लावलेली हिरो पॅशनप्रो मो.सा. क्र. एम.एच. 13 बीके 0697 ही मध्यरात्री अज्ञात चोरट्याने चोरुन नेली. अशा मजकुराच्या सागर साळुंके यांनी दि. 04.09.2020 रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

 

  “अपघात.”

पोलीस ठाणे, उमरगा: बालाजी विश्वनाथ मंडले, वय 50 वर्षे, रा. कराळी, ता. उमरगा हे दि. 31.08.2020 रोजी 10.20 वा. सु. उमरगा येथील पर्यायी रस्त्याच्या वळणावर मो.सा. क्र. एम.एच. 25 एस 9390 ही चालवत जात होते. दरम्यान कार क्र. एम.एच. 12 पीझेड 7361 च्या अज्ञात चालकाने कार निष्काळजीपणे चालवून बालाजी मंडले यांच्या मोटारसायकलला पाठीमागुन धडक दिली. या अपघातात बालाजी मंडले हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या दशरत बाबुराव कलमले यांनी दि. 03.09.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

 

 

  “मारहाण.”

पोलीस ठाणे, बेंबळी: रोहितराज विजय दंडनाईक, रा. याशवंतनगर, उस्मानाबाद हे शिलाअतुल शुगरटेक कारखान्याचे मालक आहेत. नमूद कारखाना बँकेने निलावात काढल्याने शालीवान सिद्राम माने व बब्रुवान माने, दोघे रा. सोलापूर हे तो कारखाना घेनार असल्याने रोहितराज दंडनाईक यांनी “कारखाना निलावात घेउ नका” अशी विनंती त्या दोघांना केली. यावर दि. 03.09.2020 रोजी 11.30 वा. सु. मौजे समुद्रवाणी- कोंड रस्त्यावर शालीवान माने व बब्रुवान माने यांनी रोहीतराज यांची कार अडवून त्यांची गच्ची धरुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या रोहितराज दंडनाईक यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 323, 504, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top