उस्मानाबाद येथे चोरीच्या मोबाईल फोनसह आरोपी ताब्यात

0



“उस्मानाबाद येथे चोरीच्या मोबाईल फोनसह आरोपी ताब्यात.

👉 उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखा: अक्षय सुनिल नितळे, रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर हे दि. 15.09.2020 रोजी 02.00 वा. सु. तुळजापूर येथील मलबा हॉस्पीटलजवळील जगताप हार्डवेअरच्या दुकानासमोर आपला ट्रक उभा करुन ट्रकच्या केबिनमध्ये झोपले होते. दरम्यान त्यांच्याजवळील विवो मोबाईल फोन (किं.अं. 25,000/-रु.) अज्ञात चोरट्याने चोरला होता. यावरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये पो.ठा. तुळजापूर येथे गु.र.क्र. 326 / 2020 दाखल आहे.

लोकसभेत शेती उत्पादन, व्यापार, व वाणिज्य विधेयक 2020 मध्ये चर्चेत भाग घेतला व या विधेयकात पुढील बाबी समाविष्ट कराव्या अशी विनंती केली यामध्ये प्रामुख्याने MSP च्या रेट प्रमाणे व्यापाऱ्यांनी शेती माल खरेदी करावा,शेतकऱ्यांच्या कुटुंबाला शिक्षण व नौकरित आरक्षण द्यावे, शेतकऱ्यांना बाहेर राज्यात शेती मालाची वाहतूक करण्यासाठी वाहतुक अनुदान द्यावे ,शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाराचे नोंदणी प्रमाणपत्र अनिवार्य करावे व शेतकऱ्यांना शेतमालाचे पैसे ताबडतोब द्यावे , कांदा निर्यात बंदी उठवावी, व नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या शेतमालाचे अनुदान शेतकऱ्यास द्यावे अशा प्रमुख दुरुस्त्या या विधेयकात कराव्यात अशी मागणी बिलाच्या चर्चेच्या खासदार ओमराजे निबाळकर यांनी केली विडिओ पाहण्यासाठी निळ्या अक्षरावर टच करा

👉 गुन्हा तपासात नमूद मोबाईल फोन वापरात असल्याचे सायबर पो.ठा. च्या निदर्शनास आले. यावरुन स्था.गु.शा. च्या पथकाने दि. 16.09.2020 रोजी आरोपी- विशाल कल्याण काळे, वय 26 वर्षे, रा. कुंभारी, ता. तुळजापूर यास ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून नमूद मोबाईल फोन जप्त करुन उर्वरीत कारवाईस्तव त्यास तुळजापूर पो.ठा. यांच्या ताब्यात दिले आहे. ही कारवाई सायबर पो.ठा. चे सपोनि- श्री. सचिन पंडीत, स्था.गु.शा. चे सपोनि-श्री. आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, पोहेकॉ- तानाजी माळी, भागवत झोंबाडे, पोना- समाधान वाघमारे, संतोष गव्हाणे, पोकॉ- मनोज मोरे यांच्या पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top