नका सोडू धीर, सरकार आहे
खंबीर !
उस्मानाबाद : राज्यात परतीच्या पावसाने विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील बहूतेक जिल्ह्यांना मोठा फटका बसला. शेती पिकांचेही मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना अद्याप तातडीची मदत मिळालेली नाही. पिकांच्या नुकसानीचे, घरांच्या पडझडीचे, पुराच्या पाण्यात मृत्यू झालेल्या व्यक्ती व जनावरांचे व शेतीचे पंचनामे सुरु आहेत. मात्र, प्रत्यक्षात मदत कधीपर्यंत मिळणार, याच्या चिंतेत असलेल्या नुकसानग्रस्तांना ठाकरे सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे उस्मानाबाद दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते मिलिंद नॉर्वेकर यांनी नवे स्लोगन तयार केले आहे. 'नका सोडू धीर, सरकार आहे खंबीर' यातून त्यांनी नुकसानग्रस्तांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
शिवसेनेचे सचिव मिलिंद नॉर्वेकर यांनी 'नका सोडू धीर, सरकार आहे खंबीर' या स्लोगनद्वारे बळीराजाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.
पुणे, सोलापूर, नगर, उस्मानाबाद, बीड यासह अन्य काही जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे व हवामान खात्याने येत्या दोन दिवसात देखील अतिवृष्टी होण्याचा इशारा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिला आहे
मागील पाच-सहा दिवसात खाली झालेल्या अतिवृष्टी मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतीचे नुकसान व घरांची पडझडही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. व सोलापूर जिल्ह्यात 60 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे व उस्मानाबाद , सोलापूर मध्ये जनावरेही वाहून गेल्याची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य सरकारला पाठविली आहे. मात्र, अद्याप कोणालाही तातडीची मदत मिळालेली नाही.
कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत अपेक्षित महसूल जमा होत नसल्याने राज्याची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यामुळे बाहेरुन कर्ज काढून सहा महिन्यांपासून राज्याचा कारभार चालवला जातोय, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मात्र, राज्यातील शेतकऱ्यांना निश्चितपणे मदत केली जाईल , त्यांनी धीर सोडू नये अशी पोस्टरबाजी करीत शिवसेनेने नुकसानग्रस्तांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आज दि 21.( बुधवार ) रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे नुकसानग्रस्तांसाठी कधीपर्यंत आणि किती मदत जाहीर करणार, याची उत्सुकता शेतकऱ्यांना लागली आहे .
उस्मानाबाद येथे महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दूल सत्तार हे 20 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद जिल्ह्यात दौरा करून उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषद घेतली व पत्रकार परिषदेत ना. अब्दूल सत्तार
म्हणाले की, शेतकऱ्यांचे सोयाबीन खराब झाले असून ते खरेदी करण्यासाठी जिल्हयात खरेदीकेंद्रे सुरु करावीत, पुरामुळे माती वाहुन गेलेल्या ठिकाणचे पंचनामे करावे. पंचनामे करतांना कोणीही या पंचनाम्यापासुन वंचित राहणार नाही यासाठी अधिकारी म्हणून जबाबदारीने काम करावे, कांदयासह सर्व पिकांचे पंचनामे करण्याबरोबरच शेतकऱ्यांशी सभ्यपणाने बोलून त्यांना धिर देण्याचा प्रयत्न करावा. तसेच पिक विमा कंपनीचा अधिकाऱ्यांने कृषी विभागाच्यावतीने करण्यात आलेले पंचनामे ग्राहय धरावेत. ज्या शेतात पाणी साठून राहून त्या जमीनीत चिबडाच्या बनलेल्या आहेत अशा ठिकाणी पाण्याचा निचरा काडून देणे, जूने बंधारे दुरुस्तीसाठीचा आराखडा तयार करावा. तसेच माझे कुंटुंब, माझी जबाबदारी या मोहीमे अंतर्गत आरोग्य विभाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाय योजना व कामाबाबत समाधान व्यक्त् करीत मृत्यु दराचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी वाशी, कळंब व भुम या तालुक्यात मोठया प्रमाणावर आरोग्य जनजागृती जास्ती भर दयावा अशा सुचनाही त्यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत असे मत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे.