google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 मराठा आरक्षणा संदर्भात काळेगाव येथे बैठक संपन्न

मराठा आरक्षणा संदर्भात काळेगाव येथे बैठक संपन्न

0

उस्मानाबाद ( प्रकाश साखरे )जिल्ह्यातील काळेगाव ता. तुळजापूर येथे आज सायंकाळी ७ वाजता मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हनुमान मंदिरावर बैठक संपन्न झाली यावेळी अजय भैय्या साळुंखे हे या बैठकीस प्रमुख उपस्थित होते तसेच मराठा समाजाला आरक्षण नसल्याने वेगवेगळ्या नोकरी पासून वंचित रहावे लागत आहे अशा अनेक मुद्यावर मार्गदर्शन पर भाषण केले व वेगवेगळे विषय जनतेच्या समोर मांडले तसेच तुळजापूर येथे असणाऱ्या सरकार विरोधात मराठा क्रांती ठोक मोर्चाला ९ तारखेला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले त्यांच बरोबर जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देण्यात आल्या बैठकीस नवनाथ टकले, सुजीत काटवटे, संदीप उंबरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top