महसूल मंत्री यांनी मोटर सायकल वर प्रवास करत शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची केली पाहणी

0
महसूल मंत्री यांनी मोटर सायकल वर प्रवास करत शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानीची केली पाहणी

उस्मानाबाद :- जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे राज्याचे विविध मंत्री व आमदार खासदार हे ठिकाणी जाऊन पाहणी करत आहेत व आज उस्मानाबाद जिल्ह्यात महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना. अब्दूल सत्तार साहेब आज उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. ना. अब्दुल सत्तार यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गावांत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. 


बेगडा या गावात मोठी वाहने जाणे शक्य नसल्याने ना. अब्दुल सत्तार मोटर सायकल वरून शेताच्या बांधावर गेले. आणि तेथील शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम केले. यावेळी उस्मानाबाद चे आमदार कैलास पाटील यांनी सदरील मोटर सायकल चालवली. आपल्या शेतातील नुकसानीचे पाहणी करायला मंत्री येतात की नाही या चिंतेत बसलेल्या शेतकऱ्यांना दोन नेते मोटर सायकल वरून शेतात पाहणी व धीर देण्यासाठी येतात या वरून सरकारला शेतकऱ्यांविषयी असलेली तळमळ दिसून येते.


अशाच प्रकारचे वाक्य येथील ग्रामीण भागातील नागरिकांच्या तोंडातून निघत आहेत.
 येत्या पाच दिवसात पंचनामे पूर्ण करून हे सरकार शेतकर्‍यांना मोठा दिलासा देणार असल्याचे ही पत्रकार परिषदेमध्ये अब्दुल सत्तार म्हणाले आमदार कैलास पाटील व महसूल मंत्री अब्दुल सत्तार हे मोटरसायकलवर गेलेले फोटो विडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top