google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर नविन रेल्वेमार्ग साठी व भूसंपादन साठी पर्याप्त निधी उपलब्ध करण्यात यावा खा. ओमप्रकाश राजे निबांळकर

उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर नविन रेल्वेमार्ग साठी व भूसंपादन साठी पर्याप्त निधी उपलब्ध करण्यात यावा खा. ओमप्रकाश राजे निबांळकर

0

भारतीय मध्य रेल्वेची पश्चिम विभागाची विभागीय बैठक  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पार पडली.

मुंबई :- आचच्या या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग बैठकीस #मुंबई येथुन उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी सहभाग नोंदवून उस्मानाबाद (धाराशिव) मतदारसंघातील
उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर नविन रेल्वेमार्ग साठी व भूसंपादन साठी पर्याप्त निधी उपलब्ध करण्यात यावा. या रेल्वे मार्गाला गती कशी येण्यासाठी रेल्वेचे ऑफीस भुसावळला स्थलांतरीत करण्यात आले आहे ते रद्द करण्यात यावे. तसेच उप मुख्य अभियंता चीफ इंजीनियर हे पद तात्काळ भरावे. व जिल्हयासाठी एक नोडल ऑफीसर यांची नेमणूक करण्यात यावी. 

उस्मानाबाद रेल्वे स्टेशनची प्लॅटफॉर्म लांबी वाढवावी. तसेच सुरक्षेच्या हेतूने सीसीटीव्ही कॅमेरे व सुरक्षा रक्षक नियुक्त करावीत. स्टेशनवरती सोलार एनर्जी मधून लाईट उपलब्ध करावी. व स्वच्छता व सुशोभीकरण करण्यात यावे. स्टेशनवरती रॅक पॉईंट उपलब्ध आहे. परंतू प्लॅट फॉर्म व आवश्यक शेड उपलब्ध करण्यात यावे.

पुणे-उस्मानाबाद-लातूर इंटरसिटी रेल्वे सुरू करण्यात यावी. बिदर -लातूर-मुंबई या रेल्वे गाडीची जनरल डब्बे वाढवण्यात यावे. व लातूर-मुंबई दिवसा एक रेल्वे गाडी सुरू करण्याची आवश्यक आहे. तसेच कोल्हापूर-नागपूर आठवड्यातुन दोन वेळा गाडी चालू करण्यात यावी.

20 वर्षांपासून कळंब रोड स्टेशन (कसबे तडवळा), ढोकी स्टेशन या दोन्ही स्थानका पैकी एका स्टेशनला एक्सप्रेस रेल्वेना थांबा देण्यात यावा. तसेच उस्मानाबाद-ढोकी हायवे ढोकी रेल्वे क्रॉसिंग, गोवर्धनवाडी गाव जवळ, ओव्हर ब्रिज तसेच तेर, बुकणवाडी, ढोराळा, जागजी, भिकारसारोळा आदी गावास व शेतात जाणारा साईट रस्ता दुरुस्ती करण्यात यावी. अशा विविध उस्मानाबाद रेल्वे विकास कामा संदर्भात प्रामुख्याने मुद्दे बैठकीत उपस्थित केले.

यावर सोलापूर- तुळजापूर -उस्मानाबाद नविन ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पासाठी संपादित होणाऱ्या जमिनी व भूसंपादन प्रक्रियेस वेग येण्याच्या दृष्टीने प्रकल्पासाठी वाटाघाटीने थेट खरेदी करण्याकरीता भुसंपादन समिती नेमणूक करावी यासाठी अतिरिक्त 5 कोटी निधीची मागणी करण्यात आली आहे. येत्या चार ते पाच महिन्यात नविन मार्गाचे भूसंपादन पूर्ण करण्यात येणार आहे. या मार्गाला गती येण्यासाठी सोलापूर येथे वरीष्ठ खंड अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. तसेच आवश्यक भासल्यास आणखीन अधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात येईल आल्याचे सांगितले. विभागाच्या व मुख्यालयाच्या स्तरावर असलेली कामे प्राधान्याने तत्काळ सोडविली जातील आणि रेल्वे बोर्ड स्तरावरील कामाच्या निकषांनुसार योग्य त्या सूचना पाठविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

याबैठकीस सोलापूरचे खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामी, माढाचे खा.श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर, लातूरचे खा. श्री.सुधाकर शृंगारे, श्री.संजीव मित्तल महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे, मुंबई, शैलेश गुप्ता, विभागीय रेल्वे व्यवस्थापक/सोलापूर, श्री मनिजीत सिंह प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक, श्री डि. के. सिंह प्रधान मुख्य परिचालन व्यवस्थापक, श्री. अश्विनी सक्सेना प्रधान मुख्य अभियंता, श्री. दिनेश वशिस्ठ उपमहाव्यवस्थापक, श्री. व्ही. के. नागर, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर, श्री प्रदिप हिरडे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि शाखा अधिकारी उपस्थित होते.

#रेल्वेबैठक #सोलापूर #तुळजापूर #उस्मानाबाद #Maharastra #Dharashiv #Osmanabad

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top