बांधकाम कामगारांना सेफ्टी किट व साहित्य पेटी वाटपमध्ये होणाऱ्या कामगारांची पिळवणुक व आर्थिक लुट तात्काळ थांबविणे बाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन - 1

0

बांधकाम कामगारांना सेफ्टी किट व साहित्य पेटी वाटपमध्ये होणाऱ्या कामगारांची पिळवणुक व आर्थिक लुट तात्काळ थांबविणे बाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन

 उस्मानाबाद ( प्रतिनिधी ) :- बांधकाम कामगारांना सेफ्टी किट व साहित्य पिटी वाटपमध्ये होणाऱ्या कामगारांची पिळवणुक व आर्थिक लुट तात्काळ थांबविणे बाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे , महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार व इतर कामगार कल्याणकारी मंडळ , उस्मानाबाद या कार्यालयात नोंदणीकृत असलेले बांधकाम कामगारांना सध्या सेफ्टी किट व साहित्य पिटी वाटप होत आहे . तरी त्या किट वाटपसाठी बांधकाम कामगारांकडुन एजंटद्वारे व काही संघटनेमार्फत आर्थिक लुट होत आहे . एका कामगाराकडुन एक सेफ्टी किट साठी १००० / - रू . घेतले जात आहेत हा कामगारांचे शोषण असुन सेफ्टी किट व साहित्य पिटी वाटपमध्ये होणारा भष्टाचार आहे. 
जिल्हाधिकारी साहेबांनी अशा भष्ट एजंट य संघटना यांचेवर तात्काळ आळा घालावा व गांभीर्याने कसून चौकशी करावी या संबंधीलावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी निवेदन द्वारे एल्गार जनरल कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. व सुचक इशाराही देण्यात आला आहे अन्यथा एल्गार जनरल कामगार संघटना उस्मानाबाद यांच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी . असे निवेदन पत्रात नमूद केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top