नाकाबंदी दरम्यान कारमधुन 50 कि.ग्रॅ. गांजा जप्त, भुम पोलिसांनी चौघांना केले अटक , osmanabad police

0




नाकाबंदी दरम्यान कारमधुन 50 कि.ग्रॅ. गांजा जप्त, चौघे अटकेत.

भुम: भुम पोलीस ठाण्याचे पोनि- श्री रामेश्वर खनाळ, पोहेकॉ- सोनार, पोना- जानराव, खोत, गावंदे यांचे पथक चिंचोली फाटा येथे दि. 10.11.2020 रोजी 18.40 वा. नाकाबंदी करुन वाहनांची तपासणी करत होते. नाकाबंदी दरम्यान 19.40 वा. सु. इंडीका कार क्र. एम.एच. 06 एबी 6457 ही जात असतांना पोलीसांनी थांबवली असता कारमध्ये 1)दत्ता बिरु काळे 2)रघु अरुण शिंदे, दोघे रा. पारधी पिढी, भुम 3)अविनाश रामा काळे 4)सुरेश अशोक काळे, दोघे रा. जामगांव, ता. बार्शी हे चौघे बसलेले होते. कारच्या डिकीमध्ये पोलीसांना पशुखाद्याची दोन पॉलिथीन पोत्यांत माल भरलेला आढळला. त्याबाबत विचारता नमूद चौघांनी असंबध्द उत्तरे दिल्याने पोलीसांचा संशय बळावल्याने ती दोन्ही पोती उघडून पाहता 25 पुडक्यात एकुण 50.30 कि.ग्रॅ. गांजा आढळला. यावर पोलीसांनी नमूद गांजा व वाहन जप्त करुन चौघांविरुध्द एनडीपीएस कायदा कलम- 20 (ब) अन्वये भुम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top