उस्मानाबाद मध्ये एसबीआय क्रेडीट कार्डची उधारी मर्यादा वाढवून देतो म्हणून फसवणूक
उस्मानाबाद : - पोलीस ठाणे, आनंदनगर: अंकुश बळीराम मेटे, रा. बँक कॉलनी, उस्मानाबाद हे भुदलात दिल्ली येथे नायब सुभेदार हुद्यावर असुन ते सध्या उस्मानाबाद येथे आले आहेत. दि. 13.11.2020 रोजी त्यांच्या भ्रमणध्वनीवर एका अज्ञात भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधणाऱ्या पुरुषाने, “तुमच्या एसबीआय क्रेडीट कार्डची उधारी मर्यादा वाढवून देण्यासाठी त्या कार्डवरील क्रमांक सांगा.” असे सांगीतले. यावर अंकुश मेटे यांनी तशी माहिती समोरील व्यक्तीस सांगीतली असता मेटे यांच्या भ्रमणध्वनीवर एसबीआय अधिकोषामार्फत एक संदेश आला. मेटे यांनी हा संदेशातील मजकुर वाचून- समजून न घेता त्यातील ओटीपी समोरील व्यक्तीस सांगीतला असता मेटे यांच्या क्रेडीट कार्ड- बँक खात्यातून 77,685 ₹ अन्य खात्यावर स्थलांतरीत झाले. अशा मजकुराच्या अंकुश मेटे यांच्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.