google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल : आठवडी बाजारात मोबाईल चोर पुन्हा सक्रिय !

उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल : आठवडी बाजारात मोबाईल चोर पुन्हा सक्रिय !

0




उस्मानाबाद जिल्ह्यात तीन ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल : आठवडी बाजारात मोबाईल चोर पुन्हा सक्रिय !

 उस्मानाबाद (शहर .):  राजेंद्र विठ्ठल शिंदे, रा. सांजा चौक, उस्मानाबाद हे दि. 08.11.2020 रोजी 15.00 वा. सु. उस्मानाबाद शहरातील आठवडी बाजारात गेले असता राजेंद्र शिंदे यांसह अन्य तीन व्यक्तींचे असे एकुण 4 मोबाईल फोन अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेउन चोरुन नेले. अशा मजकुराच्या राजेंद्र शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये उस्मानाबाद शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.  

उस्मानाबाद शहरातील रविवारी भरणारा आठवडा बाजारात 
पुन्हा सक्रिय झालेल्या चोरांना जेरबंद करण्याचे मोठे आवाहान उस्मानाबाद पोलिसांसमोर आहे.


* उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथे 19 ग्राम सोने व 26 हजार रोख रक्कम अशी एकूण 63 हजार रुपयांचे मुद्देमाल चोरानी केले लंपास !

 नळदुर्ग: रशिद फरीदसाब शेख, रा. मुलत्तान गल्ली, नळदुर्ग, ता. तुळजापूर यांच्या राहत्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात चोरट्याने  दिनाक. 09 नोव्हेंबर 2020 रोजी मध्यरात्री तोडून घरातील कपाटातील 19 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख 26,000 ₹ रक्कम असा एकुण 63,000 ₹ चा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या रशिद शेख यांनी आज दि. 09 नोव्हेंबर 2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अन्वये नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. 

*उमरगा बस स्थानक येथे लावलेली दुचाकीची चोरी !

 उमरगा: शिवाजी गुंडेराव बनसोडे, रा. जेकेकुर, ता. उमरगा यांनी त्यांची होंडा शाईन मो.सा. क्र. एम.एच. 25 एटी 3315 ही दि. 02.11.2020 रोजी 15.00 वा. सु. उमरगा बसस्थानक येथे लावली होती. ती त्यांना 15.30 वा. सु. लावल्या जागी आढळुन आली नाही. यावरुन ती अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. अशा मजकुराच्या शिवाजी बनसोडे यांनी आज दि. 09.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अन्वये उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top