देवेंद्र फडणवीसांचं महापालिकेत सत्ता आणण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही - जयंत पाटील

0
देवेंद्र फडणवीसांचं महापालिकेत सत्ता आणण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही - जयंत पाटील

मुंबई : मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. आमचा शिवसेनेला पाठिंबा आहे. पालिका निवडणुकीत शिवसेना, काँग्रस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार आहे, असं सांगतानाच देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेत सत्ता आणण्याचं स्वप्न पाहू नये, त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. मुंबई महापालिका आपल्या ताब्यात यावी, असं फडणवीसांना वाटणं स्वाभाविक आहे. 

पण शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस व इतर मित्रपक्ष महापालिकेत एकत्र येणार असून सत्ता आणण्याचं फडणवीसांचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असं पाटील म्हणाले. पाटील यांच्या या विधानामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, वीजबिल माफीच्या प्रश्नावर उत्तर देण्यास पाटील यांनी नकार दिला. या प्रश्नावर ऊर्जा मंत्रीच योग्य आणि सविस्तर उत्तर देतील, असं ते म्हणाले.
 
ही सर्व माहिती rno वृत्त संस्थेने दिल्याप्रमाणे प्रकाशित केली आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top