उस्मानाबाद ,पोलीस ठाणे, उमरगा: परमेश्वर धोंडीबा कांबळे, रा. ईल्लाळ, ता. बसवकल्याण, राज्य- कर्नाटक यांनी दि. 16.11.2020 रोजी 14.15 वा. सु. धाकटेवाडी, ता. उमरगा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 65 वर ट्रक क्र. के.ए. 56- 2881 हा निष्काळजीपणे चालवून भास्कर नानाराव सोनजी, वय 45 वर्षे व त्यांचा भाऊ- मधुकर गोविंदराव सोनजी, दोघे रा. कोराळी, ता. निलंगा, जि. लातूर हे दोघे प्रवास करत असलेल्या मो.सा. क्र. एम.एच. 14 डीस 2924 हिस पाठीगामून धडक दिली. या अपघातात भास्कर सोनजी हे गंभीर जखमी होउन मयत झाले तर मधुकर सोनजी हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या मधुकर सोनजी यांनी काल दि. 18.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद ,पोलीस ठाणे, बेंबळी: चालक- खंडू दत्ता रणदिवे, रा. समूद्रवाणी, ता. उस्मानाबाद हे दि. 14.11.2020 रोजी 18.00 वा. सु. उस्मानाबाद- औसा रस्त्याने ऑटोरिक्षा क्र. एम.एच. 12 एसके 4087 चालवत जात होते दरम्यान समुद्रवाणी शिवारातील लमाण तांडा परिसरात त्यांनी ऑटोरिक्षा निष्काळजीपणे, हयगईने चालवल्याने अनियंत्रीत होउन रस्त्याच्या खाली जाउन पलटला. या अपघातात रिक्षात असलेली त्यांची बहीण- सुवर्णा कुंडलीक हजारे, वय 36 वर्षे, रा. भादा, ता. औसा या जखमी होउन मयत झाल्या तर भाचा- विशाल हजारे हा गंभीर जखमी झाला. अशा मजकुराच्या केशव अर्जून हजारे, रा. भादा यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184 अन्वये काल दि. 18.11.2020 रोजी गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद ,पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): पांडुरंग राजंभर भड, सुशांत अभिमन्यु भड, राहुल भरत गरड, तीघे रा. गौडगाव, ता. बार्शी असे तीघे दि. 15.11.2020 रोजी 17.30 वा. सु. राघुचीवाडी येथील रस्त्याने मो.सा. क्र. एम.एच. 13 डीएफ 3847 ने प्रवास करत होते. दरम्यान महिंद्रा कार क्र. एम.एच. 14 बीआर 6977 च्या अज्ञात चालकाने कार निष्काळजीपणे चालवून पांडुरंग भड चालवत असलेल्या नमूद मो.सा. ला समोरुन धडक दिली. या अपघातात सुशांत भड हे किरकोळ जखमी झाले तर पांडुरंग भड व राहुल गरड या दोघांच्या पायाचे हाड मोडले. अपघातानंतर नमूद कार चालक घटनास्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या पांडुरंग भड यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उस्मानाबाद ,पोलीस ठाणे, उस्मानाबाद (ग्रा.): संजीत वाघमारे, रा. सातेफळ, ता. कळंब हे बावी शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरुन दि. 10.11.2020 रोजी 20.15 वा. सु. ट्रॅक्टर- ट्रेलर क्र. एम.एच. 44 डी 5596 हा चालवत जात होते. त्यांच्या ट्रेलरच्या पाठीमागील बाजूस दिवा व परावर्तक पट्ट्या (रिफ्लेक्टर) नसल्याने मागून येणाऱ्या टँकर ट्रक क्र. एम.एच. 13 एएक्स 9233 चे चालक अजय गुमटे, रा. गौडगाव, ता. बार्शी यांना तो ट्रेलर न दिसल्याने टँकर ट्रक त्या ट्रेलरला धडकून पलटला. या अपघातात टँकर मधील सहायक- विजय सुनिल लोहार, रा. गौडगांव, ता. बार्शी हे जखमी होउन मयत झाले. असे अकस्मात मृत्युच्या चौकशी दरम्यान निष्पन्न झाल्याने उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. चे पोना- सचिन मोराळे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184, 104/177 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.