उस्मानाबाद जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर होणार कारवाई - निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी काढले आदेश

0




उस्मानाबाद जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर होणार कारवाई - निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी काढले आदेश 

उस्मानाबाद :- covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
 त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने व जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी काढले आहेत. covid-19 च्या प्रादुर्भाव होईल असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले आहेत.

7 नोव्हेंबर 2020 रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाची व महाराष्ट्रचे मुख्यमंत्री यांची व्हिडिओ कॉन्फरन्स च्या माध्यमातून बैठक झाली त्या मध्ये मुख्यमंत्री यांनी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. व सर्व तहसिलदार यांनी मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांचेशी समन्वयाने सर्व नगरपालिका हद्दीत तसेच ग्रामीण भागात पथके स्थापन करावीत . या पथकांनी मास्क न वापरणा - या व्यक्तीविरुद्ध दंडणीय कार्यवाही करावी . गरज पडल्यास स्थानिक पोलिसांची मदत घ्यावी असे निर्देश दिलेले आहेत अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी आदेश पत्रात दिली आहे.

दि . 07.11.2020 रोजीचे VC मध्ये मा . मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या सूचनेनुसार सर्व तहसिलदार यांनी मुख्याधिकारी व गटविकास अधिकारी यांचेशी समन्वयाने सर्व नगरपालिका हद्दीत तसेच ग्रामीण भागात पथके स्थापन करावीत . या पथकांनी मास्क न वापरणा - या व्यक्तीविरुद्ध दंडणीय व फौजदारी कार्यवाही करणेबाबत आवश्यक कार्यवाही करावी . यासाठी आवश्यकतेनुसार स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात यावी . तसेच याबाबत केलेल्या कार्यवाहीचा दैनंदिन अहवाल ( मा . जिल्हाधिकारी यांचे निर्देशानुसार ) कार्यालयास सादर करावा . 

अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी आदेश पत्रात दिली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top