उस्मानाबाद शहरातील सर्वात मोठ्या समर्थ परिवार तर्फे जयंती निमीत्त आँनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन तर
चिरायु हाँस्पिटल तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले होते, काल हजरत टिपू सुलतान यांच्या270 व्या जयंती निमीत्त मान्यवरांच्या हस्ते विजेत्यना पारितोषिक वितरण करण्यात आले,
भारताचे पहिले स्वातंत्र्यसेनानी ह.टिपु सुल्तान यांच्या 270 व्या जयंतीनिमित्त समर्थ परिवारतरर्फे आँनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, या स्पर्धेमध्ये 50 हुन जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. स्पर्धेत प्रथम क्रमांक वैरागी ऐश्वर्या पांडुरंग (सांजा रोड उस्मानाबाद) ह्या विद्यार्थिनीने पटकावला तर द्वितीय क्रमांक का़जी फैज़ बीलाल यांनी तर तृतीय क्रमांक सय्यद ज़ैनब सबा अजी़म काजी़ यां विद्यार्थीनीने बाजी मारली. सोबत सुंदर हस्ताक्षर मध्ये लोहार अजय मारुती (साळुंके नगर) या विद्यार्थीने प्रथम क्रमांक पटकावला. यात प्रामुख्याने प्रथम बक्षीस 3000 रुपये व स्मृतीचिन्ह द्वितीय 2000 रुपये व स्मृतीचिन्ह
तृतीय 1000 रुपये व स्मृतीचिन्ह अशा प्रकारे बक्षीस देण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये ह.टिपु सुल्तान यांच्या जिवनचरित्र्यावर प्रकाश टाकण्यात आला. यात टिपुं सुल्तानने 156 मंदिरांना दिलेली जमीन व अलंकार, 10000 सोन्याचे नाणी कांची मंदिरला दान, व राँकेट तंत्रज्ञान अशा अनेक बाबींवर मान्यवरांतर्फे प्रकाश टाकण्यात आला.
सोबतच ह्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद येथिल चिरायु हाँस्पिटल (डाँ. विरेंद्र गवळी व डाँ.स्मिता गवळी) यांच्या तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजीत करण्यात आली ज्यामध्ये समर्थ नगर येथिल नागरिकांनी लक्षणीय सहभाग नोंदवला. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे
शजीयोद्दिन शेख,संभाजी ब्रिगेड व माराठा सेवा संघचे नंदकुमार गवारे, डा. सायेम रज़वी, डा. विरेंद्र गवळी, डाँ. स्मिता गवळी, नगरसेवक खलिफा कुरेशी, खादर खान , नगरसेवक योगेश जाधव, गफ्फार शेख, विका़र काजी़(मुन्ना सर), जिजाऊ ब्रिगेडच्या माजी जिल्हाध्यक्षा मनीषाताई राखोंडे पाटील, बहुजन क्राती मोर्चा मराठवाडा अध्यक्ष सुर्यकांत गायक्वाड सर, संभाजी ब्रिगेड जिल्हाउपाध्यक्ष आकाश मुंडे, सामाजिक कार्यकर्ते सय्यद शाहनवाज़ सय्यद, सरफराज़ कुरेशी हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन समर्थ परिवारचे अशफाक़ शेख, सुल्तान शेख, सय्यद फेरोज़, शेख शोएब, मोहसीन शेख, अजी़म शेख ,साहिल बागबान, अयान मोमीन,दाउद टकारी, फहाद सय्यद, साबेर शेख यांच्यातर्फे करण्यात आले.
छाया /राहुल कोरे आळणीकर