धक्कादायक : चाकूचा धाक दाखवत पाच चोरांनी केला लाखो रुपयांचा मुद्देमाल व सोने लंपास

0






मालकासमोर चोरांनी घर लुटले, चाकूच्या धाकामुळे काही नाही करता आले औसा तालुक्यातील उजनी गावात मंगळवारी रात्री उशिरा एका शिक्षकाचा घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे.

औसा / उजनी :- चाकूचा धाक दाखवून घरात घुसलेल्या 5 चोरट्यांनी 1 लाख 25 हजार रुपये रोख रक्कम तसेच दोन तोळे सोने व इतर साहित्याची चोरी केली आहे. याप्रकरणी भादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
50 वर्षीय रघुनाथ वळके हे आपल्या कुटुंबीयांसोबत उजनी येथे वास्तव्यास आहेत. मंगळवारी रात्री 11 च्या दरम्यान घरातील सर्वजण झोपी गेले होते. परंतु, 1 च्या दरम्यान बेडरूममधील कपाटाचे दार जोरात वाजल्याचा त्यांना आवाज आला. त्यावरून रघुनाथ वळके व त्यांच्या पत्नी यांनी पाहणी केली असता हातामध्ये वेगवेगळे धारधार शस्त्र घेऊन चोर उभे होते. एवढेच नाही तर, त्यांनी कपाटाच्या चाव्या रघुनाथ वळके यांच्याकडूनच घेतल्या. त्यांच्या समोरच घरातील रोख 1 लाख 25 हजार रुपये, दोन तोळे सोने आणि मोबाईलची चोरी झाली आहे. आरडाओरड केली तर रघुनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिली. शिवाय चोरी केल्यानंतर चोरट्यांनी घराला बाहेरून बंद करून पळ काढला. याप्रकरणी भादा पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान -औसा तालुक्यात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढत आहे.मंगळवारी रात्री झालेल्या घटनेत पाच जणांचा समावेश असल्याचे खुद्द रघुनाथ वळके यांनी सांगितले आहे.
 त्यामुळे या घटनेत कोणाचा समावेश होता याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top