आज उस्मानाबाद जिल्ह्यात सुनेचा छळ केल्या प्रकरणी असे एक व सुनेस आत्महत्येस प्रवृत्त करणे असे एक असे दोन गुन्हे दाखल

0

सुनेस आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासरकडील लोकांवर गुन्हा दाखल.

उस्मानाबाद :- पोलीस ठाणे, उमरगा: सरस्वती मनोज वाघमोडे, वय 35 वर्षे, रा. चिरेवाडी, ता. उमरगा यांनी दि. 17.11.2020 रोजी 18.00 वा. सु. सासरी- चिरेवाडी आत्महत्या केली होती. मळणी यंत्र विकत घेण्यासाठी सरस्वती या माहेरहुन पैसे आणत नसल्याच्या कारणावरुन 1)मनोज वामन वाघमोडे (पती) 2)वामन वाघमोडे (सासरा) 3)शालुबाई वाघमोडे (सासु), तीघे रा. चिरेवाडी, ता. उमरगा 4)मिठु बंडगर, रा. खामसवाडी, ता. कळंब यांनी सरस्वती यांचा सन 2009 पासुन वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ करुन माहेरहुन पैसे न आणल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. या सततच्या छळास कंटाळून सरस्वती यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या सरस्वती यांचे भाऊ- दशरथ शामराव बंडगर, रा. शिरुर, ता. आळंद, जि. कलबुर्गी, राज्य- कर्नाटक यांनी काल दि. 20.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 306, 498 (अ), 323, 504, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

सुनेचा छळ.

उस्मानाबाद :- पोलीस ठाणे, शिराढोन: श्रीमती- शितल विकास एडके, रा. वडगाव (नि.), ता. कळंब यांच्या लग्नात नवरदेवाकडील लोकांना योग्य मानपान व भेटवस्तू न दिल्याच्या कारणावरुन सासरकडील 1)विकास बापु एडके (पती) 2)बापु एडके (सासरा) 3)शोभा एडके (सासु) 4)अविनाश एडके (दिर) 5)प्रियंका पेटे (जाऊ), सर्व रा. वडगाव (नि.), ता. कळंब यांचा शितल यांच्यावर राग होता. यातून त्‍यांनी शितल यांचा सासरी- वडगाव (नि.) येथे वेळोवेळी शारिरीक- मानसिक छळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या शितल एडके यांनी काल दि. 20.11.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमदू सासरकडील लोकांविरुध्द भा.दं.सं. कलम- 498 (अ), 323, 506, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top