उस्मानाबाद जिल्ह्यातील लाँकडाउनचा कालावधी वाढला ! जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काढले आदेश

0



उस्मानाबाद जिल्ह्यातील लाँकडाउनचा कालावधी वाढला ! 
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काढले आदेश

उस्मानाबाद - मागील आदेशाप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी सर्व आदेश लागू ठेवत फक्त कालावधी वाढविला आहे . 30 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यामध्ये लोक डाऊन करण्यात आले. आहे या काळामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर मागील आदेशात काढलेल्या आदेशानुसार कारवाया करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

नागरिकांनी या काळामध्ये मागील आदेशात ज्याप्रमाणे सूचना दिल्या आहेत त्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

आदेश : ज्याअर्थी उपरोक्त वाचा क्र . 2 चे अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र शासनाने " महाराष्ट्र कोव्हीड 19 उपाययोजना नियम , 2020 " प्रसिद्ध केले असून यातील नियम क्र . 3 नुसार करोना विषाणुमुळे ( COVID - 19 ) उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे . ज्याअर्थी संदर्भ क्र . 8 अन्वये महाराष्ट्र शासनाने कोव्हिड 19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा कालावधी दिनांक 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविला आहे व लॉकडाऊनच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत . त्याअर्थी मी कौस्तुभ दिवेगावकर , जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण , उस्मानाबाद संदर्भ क्र . 2 अन्वये व फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतुदींनुसार मला प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील करोना विषाणु ( COVID - 19 ) चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून लॉकडाऊनच्या वाढविलेल्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने संदर्भ क्र . 8 चे आदेशान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक 01 नोव्हेंबर 2020 पासून ते 30 नोव्हेंबर 2020 रोजीचे 24.00 वाजे पर्यंत लॉकडाऊनचा कालावधी वाढवित आहे . उस्मानाबाद जिल्ह्यात दिनांक 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आलेल्या लॉकडाऊनचे कालावधीत संदर्भ क्र . 4 च्या आदेशामध्ये नमूद गृह विलगीकरण ( Home Quarantine ) च्या नियमांचे उल्लंघन करणा - या व्यक्तीविरोधात दंडात्मक कारवाई करणेबाबतचे आदेश संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच लागू राहतील . तसेच संदर्भ क्र . 5 च्या आदेशान्वये नमूद केलेल्या गैरकृत्यांबाबत दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश संपूर्ण जिल्ह्यात पूर्वीप्रमाणेच लागू राहतील . लॉकडाऊनचे कालावधीत संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात या कार्यालयाचे संदर्भ क्र . 7 मध्ये नमूद आदेश लागू राहतील . या कार्यालयाने यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश या आदेशासोबत दि . 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत लागू राहतील . तसेच राज्य शासनाने व या कार्यालयाने यापूर्वी वेळोवेळी अन्य कोणत्याही विशिष्टासर्वसाधारण आदेशानुसार परवानगी दिलेल्या बाबी परवानगी आदेशात नमूद केलेल्या अटी व शर्तीसह चालू राहतील . सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 , महाराष्ट्र कोविड उपाययोजना नियम 2020 चे नियम 11 , साथरोग अधिनियम 1897 तसेच भारतीय दंड संहिता ( 45 ऑफ 1860 ) कलम 188 व इतर लागू होणा - या कायदेशीर तरतुदींनुसार दंडनियाकायदेशीर कारवाईस पात्र राहील . सदर आदेशाची अंमलबजावणी दिनांक 01.11.2020 पासून तात्काळ लागू करण्यात येत आहे . 

असे आदेश पत्रात नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top