उस्मानाबाद जिल्ह्यातील तोतया पोलीस : 10 हजार रुपये रक्कम उकळली !
तोतया पोलीस अटकेत कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ,
उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील घटना
पोलीस ठाणे, कळंब: नारायण मुरलीधर गंभीरे, रा. ईटकुर, ता. कळंब हे दि. 26.12.2020 रोजी घरी असतांना एका तरुणाने तेथे येउन “मी पोलीस असुन तुमच्या विरुध्द गुन्हा दाखल आहे.” अशा धमक्या देउन गंभीरे यांच्या कडून 10,000 ₹ रोख रक्कम उकळली. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही त्या तरुणाने पुन्हा गंभीरे यांना भेटून प्रकरण मिटवण्यासाठी 50,000 ₹ रकमेची मागणी केली. यावर गंभीरे यांना त्याचा संशय आल्याने त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने त्यास पकडले असता तो तो मांडवा, ता. वाशी येथील विशाल अनिल काळे असुन तोतया पोलीस असल्याचे समजले. यावर गंभीरे यांनी कळंब पोलीस ठाण्यास कळवून विशाल काळे यास पोलीसांच्या ताब्यात दिले. यावरुन नारायण गंभीरे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन विशाल काळे याच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 384, 170, 171 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.