google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद - नळदुर्ग येथे पसार झालेल्या खुनाचा आरोपी 14 तासांत अटक

उस्मानाबाद - नळदुर्ग येथे पसार झालेल्या खुनाचा आरोपी 14 तासांत अटक

0


नळदुर्ग येथे पसार झालेल्या खुनाचा आरोपी 14 तासांत अटक


उस्मानाबाद जिल्ह्यातील ..

पोलीस ठाणे, नळदुर्ग: चालक- सहदेव मधुकर ढाकणे व सहायक- गणेश सांगळे, दोघे रा. शिरुरकासार, ‍जि. बीड हे दि. 28.12.2020 रोजी 13.30 वा. नळदुर्ग- तुळजापूर रस्त्यावर ट्रक क्र. के.ए. 63- 1222 हा चालवत जात होते. यावेळी गंधोरा शिवारातील ‘रुद्र हॉटेल’ समोर त्यांच्या ट्रकचा धक्का रस्त्याने जाणाऱ्या एका विना क्रमांकाच्या स्प्लेंडर मोटारसायकलीस लागला. यावर त्या अज्ञात दुचाकी स्वाराने ट्रक चालक- ढाकणे व सहायक- गणेश सांगळे यांना लोखंडी गजाने मारहाण केल्याने गणेश सांगळे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होउन त्यांचा मृत्यु झाला तर ढाकणे हे गंभीर जखमी झाले. यानंतर तो अज्ञात स्वार वाहनासह पसार झाला. यावरुन नळदुर्ग पो.ठा. येथे पोहेकॉ- जितेंद्र कोळी यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन अज्ञात आरोपीविरुध्द भा.दं.सं. कलम- 302, 307 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.

घटनेचे गांभीर्य पाहून प्रभारी पोलीस अधीक्षक मा. श्री संदीप पालवे यांसह उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विशाल खांबे यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासात पोलीसांना समजले की, त्या विनाक्रमांकाच्या स्प्लेंडर वरील अज्ञात मोटारसायकल स्वार हा त्या अपघातात किरकोळ जखमी झालेला आहे. यावर नळदुर्ग पो.ठा. चे सपोनि- श्री जगदीश राऊत यांच्या पथकाने तपासाची दिशा रुग्णालयांकडे वळवली. नळदुर्ग, तुळजापूर येथील रुग्णालये धुंडाळून एखादा जखमी तरुण उपचारास आला होता काय ? याची रुग्णालयांत माहिती घेण्यात आली. अखेर तो तरुण तुळजापूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारकामी दाखल असल्याचे समजताच पथकाने आज रात्री 02.30 वा. आरोपी- सुदर सतिश गवळी, वय 24 वर्षे, रा. वडगाव (देव.), ता. तुळजापूर यास रुग्णालयातून अटक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top