उस्मानाबाद - इन्‍फोसीस कंपनी मध्ये नोकरी लावतो म्हणून 1,45,388 रुपयांची फसवणूक !

0


उस्मानाबाद - इन्‍फोसीस कंपनी मध्ये नोकरी लावतो म्हणून 1,45,388 रुपयांची फसवणूक !

उस्मानाबाद शहराती , पोलिस ठाणे आनंदनगर  हद्दीतील घटना  : “आम्ही रिझ्युम हब कंपनीतुन बोलत आहोत तुम्हाला इन्‍फोसीस कंपनी मध्ये नोकरी पाहिजे आहे काय.” असे कॉल महेश नामदेव राजगुरु, रा. वरुडा रोड, उस्मानाबाद यांना दि. 03.03.2020 ते दि. 24.12.2020 दरम्यान अनेकदा 6 क्रमांकावरुन आले. यावर महेश यांनी तशी नोकरीची अपेक्षा व्यक्त केल्याने समोरील अज्ञात व्यक्तीने त्यांना सर्विस चार्ज, इत्यादी वेगवेगळे बहाने बनवून दिलेल्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगीतले. यावर महेश राजगुरु यांनी बँकेत जाउन वेळोवेळी एकुण 1,45,388 ₹ रक्कम  त्या बँक खात्यात भरली. कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे महेश राजगुरु यांच्या लक्षात आले. अशा मजकुराच्या महेश राजगुरु यांनी आज दि. 31.12.2020 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420 (क) (ड)  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top