प्लॉटची ऑनलाईन सातबारा नोंद घेण्यासाठी तलाठयास
7500 रू लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतले ताब्यात
उस्मानाबाद :- हस्तलिखित फेर झालेल्या प्लॉटची ऑनलाईन सातबारा नोंद घेण्यासाठी ९९४५/- रुपये लाचेची मागणी केली होती तक्रार याने उस्मानाबाद लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार केली व आठ हजार रुपये लाच स्वीकारताना सांजा येथील तलाठ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांनी ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती खालील प्रमाणे
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तक्रारदार यांच्या वडिलांचे नावे सांजा गावाचे हद्दीत असलेल्या व हस्तलिखित फेर झालेल्या प्लॉटची ऑनलाईन सातबारा नोंद घेण्यासाठी आरोपी नामे मनोजकुमार ज्ञानोबा राऊत, तलाठी सज्जा सांजा ता.उस्मानाबाद अति. कार्यभार सज्जा उस्मानाबाद रा.दत्तनगर, तेरणा कॉलेज जवळ, उस्मानाबाद यांनी तक्रारदार यांच्याकडे दि.२३/१२/२०२० रोजी ९९४५/- रुपये लाच रकमेची मागणी करून तडजोडी अंती ८०००/- रुपये लाच स्वीकारण्याचे मान्य केले व आज दि.२४/१२/२०२० रोजी उस्मानाबाद येथील त्यांच्या कार्यालयात ७५००/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्वीकारली.
याबाबत पो स्टे आनंद नगर, उस्मानाबाद येथे गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ अनिता जमादार ला. प्र.वि.औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. उस्मानाबाद यांनी केली.
याकामी त्यांना पोलीस अंमलदार दिनकर उगलमूगले,विष्णू बेळे,सिद्धेश्वर तावसकर,अविनाश आचार्य यांनी मदत केली.
कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद ( कार्यालय क्र. ०२४७२- २२२८७९, मो.नं.९५२७९४३१००)यांनी केले आहे.