महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री भगतसिंग कोश्यारी जी यांच्याहस्ते डॉ .नवनाथ दुधाळ यांचा पुरस्कार देऊन सन्मान
मुबई :- आज दि. २१.१२.२० रोजी गौ भारत भारती चे संपादक श्री संजयजी अमान यांच्यातर्फे आयोजित सर्वोत्तम संमान कार्यक्रमात गो संवर्धन कार्यासाठी महाराष्ट्रातून डॉ नवनाथ दुधाळ यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
महाराष्ट्राचे राज्यपाल मा. श्री भगतसिंग कोश्यारी जी यांच्याहस्ते सन्मानचिन्ह देऊन डॉ दुधाळ यांचा गौरव करण्यात आला. या वेळी मा. राज्यपाल यांनी डॉ दुधाळांच्या कार्याच कौतुक केलं त्यांना स्वतःही गो संगोपनाची आवड आहे अशी भावना व्यक्त केली , डॉ दुधाळ यांना पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या तसेच डॉ दुधाळ यांनी देशी गायीचे तूप त्यांना भेट दिल्यावर त्यांनी या तुपाचे मूल्य १ लाखाचे असल्याचे सांगितले एवढी देशी गायीची महती आहे, तसेच डॉ दुधाळ व हितेश दुधाळ यांनी राज्यपालांना, "दवा ना खाना" , रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी "गो शक्ती किट" देखील भेट दिली. डॉ दुधाळ यांनी मां राज्यपालांचे आभार मानून सन्मान स्वीकार केला.
नवनाथ दुधाळ यांचा राज्यपाल यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान झाल्याने महाराष्ट्रभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे