नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना नाहक त्रास : दोन लहान मुल मृत्यूच्या दारातून परत !
उस्मानाबाद शहरातील वैराग नाका फकीरा नगर या भागामध्ये अनेक वर्षापासून नगरपालिकेत दिल्या जाणाऱ्या सुविधा पासून हा भाग वंचित राहिला आहे. वीस पंचवीस वर्षा पुर्वी नाल्याचे काम केलेल्या गुत्तेदारानी ओबडधोबड काम केल्याने या भागामध्ये पावसाळ्यामध्ये नालीतील पाणी घरांमध्ये शिरते काही ठिकाणी नालीत साचुन राहते व नगरपालिका वेळोवेळी स्वच्छता करत नसल्याने नाल्यांंनमध्ये आनेक ठिकाणी भर गच्च घाण साठली होती .
दि 30 डिसेंबर रोजी एका किराणा दुकना समोर एक लहान मुलगा खेळता खेळता नालित पडला व जवळ थांबलेल्या नागरिकांनी ताबडतोब पाहिल्याने त्या लहान मुलाला नालीतून काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले व त्या मुलाचे प्राण वाचले यांच भागातील दर्ग्याच्या पाठीमागील एका गल्लीमध्ये तीन ते चार वर्षा अगोदर नालीत पडल्याने एका लहान मुलाचा मृत्यू झाला होता.
व दि 29 डिसेंबर रोजी देखील एक लहान मुलगी खेळता खेळता नालीत पडली जवळ थांबलेल्या नागरिकांनी ताबडतोब पाहिल्याने मुलीचे प्राण बचावले...
नागरिकांनी 30 डिसेंबर रोजी नगरसेवक , काही राजकीय नेत्यांना याची माहिती दिल्यावर आज सकाळी काही ठिकाणची नालीतील साठलेली घाण साफ करण्यात आली आहे.
या भागात नगरपालिका निवडणूक झाल्या नंतर चार वर्षांमध्ये बोटावर मोजावी इतकीच विकास कामे या ठिकाणी झाली आहेत.