उस्मानाबाद जिल्हा पोलिस विभागास अपघात रोखण्यास यश : अपघातांचा आलेख 21 % घसरला.

0


उस्मानाबाद जिल्हा पोलिस विभागास अपघात रोखण्यास यश : अपघातांचा आलेख 21 % घसरला.

सन- 2020 मधील रस्ता अपघातांचा आलेख 21 % घसरला.

उस्मानाबाद :-  जिल्ह्यातील रस्ता अपघातांना  प्रतिबंध व्हावा या उद्देशाने जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे नागरीकांत जनजागृती केली जात आहे. त्यास अनुसरुन शहर वाहतुक शाखा व जिल्ह्यातील 18 पोलीस ठाण्यांमार्फत हद्दीतील रस्त्यांवर वाहन चालकांमध्ये तसेच युवक मंडळांत जनजागृती करणे, ट्रॅक्टर- ट्रेलर, बैलगाड्यांवर रिफ्लेक्टर पट्ट्या चिकटवणे असे उपक्रम राबवले जात आहेत. जिल्ह्यात सन- 2019 मध्ये 706 रस्ता अपघात तर सन- 2020 मध्ये 559 रस्ता अपघात नोंदवण्यात आले असुन एकंदरीत सन- 2019 च्या तुलनेत सन- 2020 मध्ये रस्ता अपघातांचे प्रमाण 21 % घटले आहे. अशा प्रकारे शासन- प्रशासनाने केलेल्या सामाजिक जनजागृतीचा व जनतेच्या सहकार्याचा सकारात्मक परिणाम दिसुन येत आहे. नागरीकांनी रस्ता वाहतुक नियमांचे पालन करुन स्वत:सह इतरांचे जिवीत व वित्त अबाधित राखावे असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन यांनी जिल्ह्यातील जनतेस केले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top