नगराध्यक्ष प्रीमिअर लीग स्पर्धेत उस्मानाबाद कॅपिटल संघाने मारली बाजी
उस्मानाबाद :- इंडियन प्रीमियर लीगच्या धर्तीवर इस्माईल भाई मिञ परिवार व गाजी स्पोर्ट्स क्लब यांच्या वतीने तुळजाभवानी स्टेडियम येथे आयोजित नगराध्यक्ष प्रीमियर लीग चा अंतिम सामना उस्मानाबाद कॅपिटल्स व उस्मानाबाद किंग्ज एलेव्हन या दोन संघात झाला. अंतिम सामन्यात उस्मानाबाद कॅपिटल्स ने विजय मिळवून नगराध्यक्ष प्रीमियर लीग स्पर्धेवर नाव कोरले. या विजेत्या आणि उपविजेत्या संघाना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे उस्मानाबाद शहराध्यक्ष अयाज उर्फ बबलू शेख,माजी नगरसेवक सय्यद खलील, नगरसेवक प्रदीप घोणे, खलिफा कुरेशी, बाबा मुजावर, इस्माईल शेख, सुजित ओव्हाळ, माजी नगरसेवक अफरोज पिरजादे, मजूर फेडरेशन चे संचालक बिलाल तांबोळी, एजाज काझी, गयास भाई व क्रिकेट प्रेमींची उपस्थिती होती. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नगरसेवक इस्माईल भाई यांच्या समवेत गाजी स्पोर्ट्स क्लब चे आसेम काझी, इम्रान पठाण, शकीब शेख, मजहर पठाण, सय्यद वाजीद, शहेबाज पठाण, शेख आमेर यांनी मेहनत घेतली.