अखेर उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मंजुरी , ऐतिहासिक निर्णयाने उस्मानाबादकरांची फरफट थांबणार , प्रचंड आतषबाजीने निर्णयाचे स्वागत

0
अखेर उस्मानाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मंजुरी

ऐतिहासिक निर्णयाने उस्मानाबादकरांची फरफट थांबणार 

प्रचंड आतषबाजीने निर्णयाचे स्वागत 

उस्मानाबाद दि.१३ (प्रतिनिधी) - उस्मानाबाद येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर व्हावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा वासियांचे प्रयत्न व पाठपुरावा शासन दरबारी सुरू होता. प्रत्तेक अधिवेशनामध्ये या महाविद्यालयाची घोषणा होईल याकडे जिल्हा वासियांच्या नजरा खिळलेल्या असायच्या मागील सरकारने सभागृहांमध्ये दोन वेळेस घोषणा देखील केली. मात्र निर्णय झाला नव्हता. परंतू महाविकास आघाडी सरकारने या महाविद्यालयास मंजुरी देऊन उस्मानाबाद करांची मागणी तर पूर्ण केलेच आहे त्याबरोबरच मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला ऐतिहासिक गोड बातमी दिल्याने तिळगुळाची चौक खऱ्या अर्थाने जिल्हावासीयांना चाखायला मिळणार आहे.
उस्मानाबाद येथे हे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याला संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय निर्माण करण्यास महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या १९९८ च्या नियमांमध्ये सुधारणा करीत या वैद्यकीय महाविद्यालयास मंत्रिमंडळाने दि.१३ जानेवारी रोजी मंजुरी दिली आहे.
महाविद्यालयास मंजरी दिल्याची माहिती होताच उस्मानाबाद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते एकत्र येत त्यांनी प्रचंड फटाक्याची आतषबाजी करीत व शिवाजी महाराज तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून घोषणाबाजी करीत व पेढे भरवून आनंदोत्सव, जल्लोष साजरा केला.  यावेळी खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रवीण उर्फ पिंटू कोकाटे, भिमाण्णा जाधव, पाटील दुधगावकर, हनुमंत देवकते, मसूद शेख,  मोहिनुद्दीन पठाण, नगरसेक सोमनाथ गुरव, अमित, अमित शिंदे, खलिफा कुरेशी, इजाज काझी, गणेश असलेकर, तुषार निंबाळकर, राणा बनसोडे, प्रदीप घोणे, बाबा मुजावर,  इस्माईल शेख, सिद्धेश्वर कोळी, कुणाल निंबाळकर, बबलू शेख, बंडू आदरकर, खलील सय्यद, बिलाल तांबोळी, राहुल पवार, अजिज पठाण, मिलिंद कोकाटे, दीपक जाधव बाळासाहेब शिंदे, महादेव माळी, सुनील काकडे, दत्ता पेठे, जाकिर पठाण, पंकज पाटील, पृथ्वीराज चिलवंत, बालाजी साळुंखे, ‌ युवराज कुऱ्हाडे, रोहित पडवळ, जलील काझी, उमेश राजेनिंबाळकर, मिलिंद कोकाटे, गणेश खोचरे, साजिद शेख आदीसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top